नवी दिल्ली - दिल्लीतील दंगलींबाबत आक्षेपार्ह वार्तांकन केल्यामुळे, केरळमधील दोन वृत्तवाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने शुक्रवारी हा निर्णय घेतला. ४८ तासांसाठी या वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
मीडिया वन आणि एशियानेट न्यूज टीव्ही अशी या दोन वाहिन्यांची नावे आहेत. या दोन्ही वाहिन्यांना मंत्रालयाने याआधी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी काहीही उत्तर न दिल्य़ामुळे मंत्रालयाने त्यांच्याविरोधात ही कारवाई केली आहे.
यामध्ये या वृत्तवाहिन्यांना ४८ तासांसाठी कोणत्याही नव्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण, किंवा जुन्या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण करता येणार नाही. सहा मार्च सायंकाळी ७.३० ते आठ मार्च सायंकाळी ७.३० पर्यंत ही बंदी लागू असणार आहे.
हेही वाचा : येस बँकेवरील निर्बंधांचा देवालाही फटका; ओडिशामधील जगन्नाथ देवस्थानाचे ५४५ कोटी अडकले..