नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगभरामधील डॉक्टर कोरोनावर औषध शोधत आहेत. यातच हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. हिमाचलमध्ये एका दिवसांमध्ये 2 लाखांपासून ते 1 कोटी गोळ्यांचे उत्पादन होत आहे.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या गोळ्यांचे उत्पादन फार्मा हब बीबीएन करत आहे. गोळ्याच्या उत्पादनासाठी राज्यातील 50 उद्योगांना सरकारी परवाणा देण्यात आला आहे. एका दिवसात 2 लाख ते 1 कोटी गोळ्या तयार करण्याची क्षमता या उद्योगांमध्ये आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन गोळ्याचे 40 टक्के उत्पादन हिमाचलमध्ये होत आहे.
हिमाचलमधील सुमारे 50 उद्योगांकडे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन उत्पादनाचा परवाना आहे. त्याचबरोबर सोलन जिल्ह्यातील बीबीएन क्षेत्रात असे 23 उद्योग आहेत. जिथे या औषधाचे उत्पादन केले जात आहे. एका उद्योगांमध्ये दररोज 2 लाख ते 1 कोटी टॅब्लेट तयार करण्याची क्षमता आहे, असे हिमाचल प्रदेशचे उप औषध नियंत्रक मनीष कपूर यांनी सांगितले.
हायड्रोक्सिक्लोरोक्वाईन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. अमेरिकेसोबतच आणखी काही देशांनीही या औषधाची मागणी भारताकडे केली आहे. भारतात या औषधाचे सर्वाधिक उत्पादन होत असल्याने भारत अनेक देशांना या औषधाचे निर्यात करत आहे.