हैदराबाद - प्रयत्न करणाऱ्यांला कधी अपयश येत नाही. हे वाक्य हैदराबादच्या विशाल रंजन या युवकाने खरे करून दाखवले आहे. त्याने अथक परिश्रमानंतर विना प्लास्टिक, यूपीआय आधारित क्रेडिट कार्ड तयार केले आहे. वाढता प्लास्टिक कचरा कमी करणं, हा त्याचा यामागचा उद्देश आहे.
नो टू सिंगल युज प्लास्टिक: हैदराबादच्या युवकानं बनवलं विना प्लास्टिक क्रेडिट कार्ड
यूपीआय आधारीत क्रेडीट कार्ड असल्याने सहजतेने व्यवहार करता येतात. या कार्डला दोन लाखांची मर्यादा असून मोबाईल अॅपलिकेशनच्या मदतीने हे काम करते. भविष्यामध्ये पैसै काढण्यासाठी आधी अॅपमध्ये पैसे जमा करा आणि पाहिजे तेव्हा पैसै काढा अशी ही संकल्पना आहे.
हैदराबाद - प्रयत्न करणाऱ्यांला कधी अपयश येत नाही. हे वाक्य हैदराबादच्या विशाल रंजन या युवकाने खरे करून दाखवले आहे. त्याने अथक परिश्रमानंतर विना प्लास्टिक, यूपीआय आधारित क्रेडिट कार्ड तयार केले आहे. वाढता प्लास्टिक कचरा कमी करणं, हा त्याचा यामागचा उद्देश आहे.
नो टू सिंगल युझ प्लास्टिक: हैदराबादच्या युवकानं बनवलं विना प्लास्टिक क्रेडिट कार्ड
हैदराबाद - प्रयत्न करणाऱ्यांला कधी अपयश येत नाही. हे वाक्य हैदराबादच्या विशाल रंजन या युवकाने वाक्य खरे करून दाखवले आहे. त्याने अथक परिश्रमानंतर विना प्लास्टिक, यूपीआय आधारित क्रेडिट कार्ड तयार केले आहे. वाढता प्लास्टिक कचरा कमी करण हा त्याचा यामागचा उद्देश आहे.
विशालने हैदराबादमधून एमबीएची पदवी घेतली आहे. त्याच्या या कामाचे आत्तापर्यंत कोणी कौतुक केले नाही, किंवा पाठींबाही दिला नाही. तरीही तो विना प्लास्टिक मोबाईल आधारित व्ही कार्ड म्हणजेच व्हर्चुअल कार्ड बनवण्यात यशस्वी झाला आहे.
या व्ही कार्डचा उपयोग मोबाईलच्या मदतीने करता येतो. याचा वापार साधारण क्रेडिट कार्डसारखाच आहे. व्ही कार्ड कंपनीचे सीईओ विशाल रंजन यांनी व्ही कार्डबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे हे मोबाईलवर वापरता येणारे क्रेडिट कार्ड आहे. तसेच युपीआय कोडवर चालणारे हे एकमेव क्रेडिट कार्ड आहे.
यूपीआय आधारीत क्रेडीट कार्ड असल्याने सहजतेने व्यवहार करता येतात. या कार्डला दोन लाखांची मर्यादा असून मोबाईल अॅपलिकेशनच्या मदतीने हे काम करते. भविष्यामध्ये पैसै काढण्यासाठी आधी अॅपमध्ये पैसे जमा करा आणि पाहिजे तेव्हा पैसै काढा अशी ही संकल्पना आहे. सामान्य क्रेडिट कार्डनुसार ३० दिवसांच्या आत पैसे पुन्हा भरावे लागणार आहे. या कार्डवरून ईएमआयही भरता येण शक्य होणार आहे.
व्ही कार्ड जर उपयोगी ठरले तर त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो, सरकारही त्याच्या वापराला प्रोत्साहन देईल.
व्ही कार्डचे संचालक विशाल रंजन म्हणाले की, नोटबंदीनंतर मागील ३ वर्षात २० कोटी नागरिकांनी क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आहे. त्यातील फक्त १ कोटी जणांना क्रेडिट कार्ड मिळाले आहे. भारताची लोकसंख्या आणि वाढत्या गरजा पाहता क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढेल. पुढे जाऊन अडचणींचा सामना करण्यापेक्षा आपण आत्ताच या पर्यायाचा वापर करायला हवा.
सध्या विशाल रंजन या व्ही कार्डला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या व्ही कार्ड देशातील ४७ शहरांमध्ये सेवा देत आहे. ही सेवा देशातील इतर शहरातही पोहचावी आणि पर्यावरण प्लास्टिक मुक्त व्हावे हा त्यांचा उद्देश आहे.
Conclusion: