ETV Bharat / bharat

हैदराबादमध्ये भिंत कोसळून युवकाचा मृत्यू... - भिंत कोसळून युवकाचा मृत्यू

शेजारील इमारतीची भिंत घरावर पडल्याने हैदराबादमधील एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

Hyderabad youth dies after wall collapses on him

author img

By

Published : Apr 27, 2020, 11:25 AM IST

हैदराबाद - शेजारील इमारतीची भिंत घरावर पडल्याने हैदराबादमधील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सांयकाळी घडली. रितेश (वय 20) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मुसळधार पावसामुळे येथील मंगळघाट परिसरातील रितेशच्या घरावर शेजारील इमारतीची भिंत कोसळली. यावेळी रितेश आपल्या घरात झोपलेला होता. भिंत कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यावर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी शेजाऱ्यांवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 304-ए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.