ETV Bharat / bharat

'माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल, तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आभार' - हैदराबाद पुलिस

तेलंगणा पोलिसांनी या चार आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. या एन्काऊंटरविषयी वेगवेगळी मतेही व्यक्त होत आहेत. हा एन्काऊंटर सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांच्या अधिकारात झाला. सध्या सज्जनार यांचे नाव सोशल मीडियावर हिट झाले आहे.

'माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल'

author img

By

Published : Dec 6, 2019, 11:24 AM IST

Updated : Dec 6, 2019, 11:50 AM IST

हैदराबाद - पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार करून तिला ठार करून जाळून टाकणाऱ्या चार आरोपी आज तेलंगणा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारले गेले. यानंतर पीडितेच्या वडिलांची आणि बहिणीची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी 'माझ्या मुलीचा मृत्यू होऊन आज १० दिवस झाले आहेत. माझ्या मुलीच्या आत्म्याला आता शांती मिळेल. मी तेलंगणा सरकार आणि पोलिसांचे आभार मानतो,' असे उद्गार काढले आहेत.

तेलंगणा पोलिसांनी या चार आरोपींचे एन्काऊंटर केल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. या एन्काऊंटरविषयी वेगवेगळी मतेही व्यक्त होत आहेत.

माझ्या बहिणीला विक्रमी वेळात न्याय दिला

पीडितेच्या बहिणीनेही या एन्काऊंटरनंतर समाधान व्यक्त केले आहे. 'माझ्या बहिणी अत्याचार करणाऱ्यांचे आणि तिची हत्या करणाऱ्यांचे एन्काऊंटर झाले आहे. मला याचा खूप आनंद आहे. यामुळे एक उदाहरण प्रस्थापित होईल. पुन्हा कुणी असे करण्याचा विचार करणार नाही, अशी आशा आहे. त्यांनी अगदी विक्रमी वेळात माझ्या बहिणीला न्याय दिला आहे, असे मला वाटते. मी आमच्या पाठिशी उभे राहणाऱ्या सर्वांचे आभार मानते. मी पोलीस, मीडिया आणि तेलंगणा सरकारचेही आभार मानते,' असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे.

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. मानवतेला काळीमा फासणाऱ्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी करण्यात येत होती. तसेच, सात वर्षांपूर्वी दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांनाही लवकरात लवकर फाशी द्यावी, या मागणीनेही जोर धरला होता.

निर्भयाच्या आईने व्यक्त केला आनंद
हैदराबाद प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरनंतर निर्भयाची आई आशा देवी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. पोलिसांनी चांगले काम केले. त्या आरोपींना योग्य शिक्षा मिळाली. या एन्काऊंटरसाठी पोलिसांवर कोणताही कारवाई होऊ नये, अशी मागणी मी करते,' असे त्यांनी म्हटले आहे. 'मी मागील सात वर्षे न्यायासाठी झगडते आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा म्हणून व्यवस्था आणि न्यायपालिका यांचे दरवाजे सतत ठोठावते आहे. आता निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांनाही लवकरात लवकर फाशी द्यावी,' असे आशा देवी यांनी म्हटले आहे.

पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार सोशल मीडियावर हिट

दरम्यान, हैदराबाद प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर सायबराबाद पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांच्या अधिकारात झाला. सध्या सज्जनार यांचे नाव सोशल मीडियावर हिट झाले आहे. त्यांच्या नावाचा हॅशटॅग जोरदार चालत आहे. त्यांनी याआधीही अनेक एन्काऊंटर केल्याचा इतिहास आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 6, 2019, 11:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.