हैदराबाद - येथील ग्लँड फार्मा कंपनीने 27 प्राण्यांना एका वर्षासाठी 20 लाख रुपयांचे प्रायोजकत्व देऊन दत्तक घेतले. दत्तक घेतलेल्या प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, जिराफ, पाणघोडा आणि हरीण यांचा समावेश आहे. तसेच शहामृग, फ्लेमिंगो, हॉर्नबिल आणि गिधाडे या पक्षांनीही दत्तक घेतले.
ग्लॅंड फार्माच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी संघाच्या कार्यकारिणींने प्राणिसंग्रहालयात भेट दिली आणि ए नागमणींना हा धनादेश सादर केला, अशी माहिती हैदराबादचे नेहरू प्राणीसंग्रहालयाचे उपप्रमुख यांनी दिली. मार्च 2020 ते 5 ऑक्टोबर या कालावधीत कोविडच्या साथीच्या रोगामुळे प्राणीसंग्रहालय अभ्यागतांसाठी बंद होते. त्यातील बहुतांश महसूल गमावला असला तरी प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्यांनी नियमितपणे आपले कर्तव्य बजावले आणि जनावरांचे आरोग्य व स्वच्छता चांगल्या स्थितीत राखली, असे नागमणी म्हणाले.
27 प्राणी दत्तक घेतल्याबद्दल उपप्रमुखांनी फार्मास्युटिकल कंपनीचे आभार मानले. तसेच ते म्हणाले, निधीतून प्राणीसंग्रहालयात मोठी मदत होईल. लोकांना पुढे येऊन पशुसंवर्धनाचा भाग होण्यासाठी जनावरे दत्तक घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.