हैदराबाद - तेलंगणा येथील बालापूर गणेश लाडवाचा तब्बल १७. ६० लाखांना लिलाव झाला आहे. कोलन रामी रेड्डी यांनी २६ व्या वर्षी हा लाडू खरेदी केला. मागील वर्षी हा लाडू टी. श्रीनिवास गुप्ता यांनी १६. ६० लाखांना खरेदी केला होता.
या वर्षी मागील वर्षापेक्षा एक लाखाने वाढीव किमतीला हा लाडू विकला गेला. या लाडूच्या विक्रीसाठी सकाळी १०.२३ ला लिलाव सुरू झाला. बालापूर गणेश उत्सव समितीने २६ व्या वर्षी या लाडूचा लिलाव करत इतिहास घडवला आहे.
हेही वाचा - पुण्याच्या पाचही मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
आज सकाळी या लाडवाचा लिलाव सुरू झाल्यानंतर एकूण १९ जणांनी या लाडूसाठी बोली लावली. सकाळी १ हजार ११६ रुपयांनी लाडवासाठी बोली लावण्यास सुरुवात झाली. अखेर तब्बल १७.६० लाख रुपयांना गणेशभक्त रेड्डी यांनी तो लाडू खरेदी केला.
हेही वाचा - निरोप लाडक्या बाप्पाला ; कोल्हापुरात पंचगंगेकिनारी गणेश मंडळे दाखल