ETV Bharat / bharat

भारतासाठी ऑनलाईन शिक्षण कितपत अर्थपूर्ण, कोणती आहेत आव्हाने? - ऑनलाईन शिक्षण

कोरोना विषाणुने मानवी जीवनाच्या जवळपास सर्व क्षेत्रांवर परिणाम केला आहे. दुस क्षेत्रांवरील त्याचे व्यापक परिणाम हळूहळू समोर येतीलच, पण शिक्षण व्यवस्थेत त्याचा प्रभाव आता दिसू लागला आहे. अशात आता देशाकडे ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. परंतु देश यासाठी तयार आहे का, हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.

How practical is Online Education in India
भारतासाठी ऑनलाईन शिक्षण कितपत अर्थपूर्ण, कोणती आहेत आव्हाने?
author img

By

Published : May 15, 2020, 3:59 PM IST

हैदराबाद - कोरोना विषाणुपासून निर्माण झालेल्या महामारीने मानवी जीवनावर परिणाम केला आहे. २४मार्चला या महामारीमुळे देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोसळत गेली आणि शिक्षण जगतावर याचा तीव्र परिणाम झाला आहे. देश आता ऑनलाईन शिक्षणाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. तरी सध्याच्या घडीला भारत अशा प्रकारच्या शिक्षणासाठी कितपत तयार आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. येथे हे सांगायला हवे की २४ मार्चपासून शाळा, महाविद्यालयांच्या फाटकांना कुलूप लागले आहे, कारण देश लॉकडाऊनमध्ये आहे.

आपल्या सर्वांना ठाऊकच आहे, कोरोना विषाणु हा एक संसर्गजन्य रोग आहे. यापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगच्याशिवाय दुसरा कोणताही उपाय भारतासह संपूर्ण जगाकडे नाही. कारण कोरोनावर उपचारासाठी अजून औषधांचा शोध लागलाच नाही. लॉकडाऊनमध्ये कुणीही समूहात राहू शकत नाही. कारण यामुळे कोरोना पसरण्याचा धोका जास्त असतो. सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार लोकांना आपल्या घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या परिस्थितीत शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांचे कार्य सामान्यपणे चालणे अवघड होणार आहे. कारण शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलांना एका ठिकाणी जमणे आवश्यक असते आणि जे लॉकडाऊनमध्ये शक्य नाही. अशात आता ऑनलाईन शिक्षणाच्या मागणीला जोर चढू लागला आहे.

पण प्रश्न हा आहे की भारत ऑनलाईन शिक्षणाला एक पर्याय म्हणून तर स्विकारू शकतो, परंतु त्या पद्धतीला आपलंसं करण्यास तयार होईल?

आम्ही असे मानतो की लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण सामान्य पद्घतीने दिल्या जाणार्या शिक्षणासाठी उत्कृष्ट पर्याय होऊ शकतो. परंतु येथे अनेक प्रकारच्या अडचणी समोर येऊ शकतात. कारण भारतातील मुलांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यास करण्याची, एकत्र शिकण्याची सवय आहे. शिक्षकही मुलांच्या समोरासमोर राहूनच शिकवतात. अशात हा सर्वात मोठा प्रश्न आहे की भारत समोरासमोर राहून शिक्षणापासून दूर जाऊन ऑनलाईन शिक्षणासाठी तयार आहे का? या देशात ऑनलाईन वर्गांसारखे मोठे बदल आणले जाऊ शकतात?

मुलांच्या शिक्षणाचे होणारे नुकसान कमीत कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ऑनलाईन योजनेवर काम सुरू केले आहे. ते अधिक चांगले बनवण्यासाठी लोकांकडून सूचनाही मागवल्या आहेत.

एक चांगली गोष्ट हीही आहे किंवा याला आम्ही आशेचा किरणही म्हणू शकतो कारण काही शिक्षक मोठ्या प्रमाणावर खुल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या पोर्टलचा उपयोग करत आहेत. विद्यार्थीही त्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

क्यूएसच्या अहवालानुसार कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊननंतर भारताने ऑनलाईन अभ्यासक्रमांचा स्वीकार केला आहे, परंतु तो त्यासाठी संपूर्णपणे तयार नाही. वास्तविकता अशी आहे की काही शिक्षक मोठ्या प्रमाणावर खुल्या ऑनलाईन अभ्यासक्रमांसारख्या पोर्टलचा उपयोग करत आहेत.

पहाणीत असे दर्शवले आहे की भारतात तंत्रज्ञानाच्या मूलभूत चौकटीतच गुणवत्तेची कमतरता आहे. यामुळे देशभरात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

मार्च २०१९ च्या एका आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर ४.४ अब्ज इंटरनेट वापरकर्ते आहेत, ज्यात केवळ ५६ कोटी भारतीय आहेत.

भारतात ऑनलाईन शिक्षणाच्या कार्यरत होण्यातील प्रमुख अडचणी..

देशात आताही काही समस्या आहेत ज्यात इंटरनेट सुविधा प्रमुख आहे. देशात कनेक्टिव्हिटी आणि सिग्नल मिळत नसणे हे मुद्दे विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्रचलित समस्या आहेत. असे असूनही संबंधित राज्ये आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या अजून या तांत्रिकी आव्हानांवक मात करण्यात यशस्वी झालेल्या नाहीत. योग्य मूलभूत चौकटीची कमतरत असल्याने ऑनलाईन पद्धतीवर संपूर्ण अवलंबित्व हे सध्या तरी एक स्वप्नच आहे.

शिक्षणावर राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवाल २०१७-१८ अनुसार, ६० टक्के भारतीय गावांमध्ये रहातात आणि त्यापैकी केवळ १५ टक्के घरांमध्ये इंटरनेटचा उपयोग केला जातो. तर ४२ टक्के शहरातील घरांमध्ये इंटरनेट पोहचलेले आहे. येथे घर आणि इंटरनेटच्या सामान्य उपयोगात फरक करणे महत्वाचे आहे.

पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये केवळ ७ ते ८ टक्के ग्रामीण कुटुंबांमध्ये इंटरनेट पोहचलेले आहे. विद्यापीठाच्या ८५ टक्के विद्यार्थी जे शहरी घरांमधून येतात, त्यापैकी ४१ टक्के इंटरनेटचा वापर करतात. तरीही अशी शक्यता आहे की ते घरीच याचा उपयोग जास्त करत असावेत.

या सर्वांपेक्षा अलग अशी आणखी एक गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे शिक्षणातील डिजिटल विभाजन नष्ट करण्यासाठी हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क उपकरण, जोडणी आणि चोविस तास आणि सात दिवस विश्वसनीय माहितीची उपलब्धता हीच एकमेव किल्ली आहे.

देशात ऑनलाईन शिक्षण एक चांगला आणि उत्कृष्ट विचार आहे. यासाठी देशाला आपल्या क्षमतांचा विकास वेगाने करावा लागेल, ज्यामुळे मुलांचे भविष्य सोनेरी होईल.

हेही वाचा : कोरोना इफेक्ट; नाशिक पालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांना देणार डिजिटल शिक्षण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.