चमोली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात सध्या शीतलहर आली आहे. येथे पांढऱ्याशुभ्र बर्फाची दुलई पसरली आहे. नदी-नाले पूर्णपणे गोठले आहेत. मात्र, यादरम्यान, येथील जोशीमठामध्ये निसर्गाचा चमत्कार पहायला मिळत आहे. नद्या गोठलेल्या असताना येथील जमिनीखालून उकळते पाणी बाहेर येत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक दूरवरून येत आहेत.
हेही वाचा -बिपीन रावत पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'
सध्या चमोलीतील औली येथे किमान तापमान उणे १३ अंश सेल्सियसपर्यंत उतरले आहे. इतक्या कमी तापमानामुळे नद्या-नाले गोठले आहेत. अशात डोंगरदऱ्यांमधील जोशीमठ येथील उकळत्या पाण्याचा झरा सध्या रहस्यमय आणि चर्चेचा विषय बनला आहे. निसर्गाची ही किमया पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
बर्फाने झाकलेल्या डोंगर-दऱ्यांमधील पाण्याच्या झऱ्यातून गरम पाणी का येत आहे, हे कोडे अद्याप उलगडलेले नाही. मात्र, या पाण्यात एखादे अंडे १० मिनिटांत सहज उकडले जाईल, इतके हे पाणी कडकडीत गरम आहे.
हेही वाचा - नागालँडमध्ये सशस्त्र बल विशेष अधिकार कायदा पुढील 6 महिन्यांसाठी लागू