मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. येत्या रविवारी रात्री नागरिकांनी वीज बंद करुन दिवे, मेणबत्या आणि मोबाईल टॉर्च लावावेत, असे आवाहन मोदींनी नागरिकांना केले. मोदींच्या या निर्णयावर राऊत म्हणाले की, रविवारी लोकांनी त्यांच्या घरांनाच आगी लावून घेतल्या नाही, म्हणजे मिळवले.
-
When people were asked to clap , they crowded the roads and beat drums , I just hope now they don't burn down their own houses , sir 'diya to jalalenge ' but please tell us what the government is doing to improve condition
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">When people were asked to clap , they crowded the roads and beat drums , I just hope now they don't burn down their own houses , sir 'diya to jalalenge ' but please tell us what the government is doing to improve condition
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020When people were asked to clap , they crowded the roads and beat drums , I just hope now they don't burn down their own houses , sir 'diya to jalalenge ' but please tell us what the government is doing to improve condition
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 3, 2020
काही दिवसांपूर्वीच कोरोनाविरोधात लढण्यासाठी मदत करणाऱया आरोग्य आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. त्यावेळी लोकांनी थेट रस्त्यांवर गर्दी करत ढोल बडवले होते, आता दिवे लावताना आगी लावू नयेत अशी आशा आहे. 'दिवे तर लागतील मात्र, सध्या देशातील स्थिती सुधारण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे ते सांगा', असे ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका केली.
कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांसाठी एक व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात त्यांनी लॉकडाऊनला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. 'रविवारी सर्वांनी एकत्र येत रात्री 9 वाजता घरातील सर्व वीज बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावण्याचे अवाहन केले आहे.