ETV Bharat / bharat

आता 'हॉटस्पॉट'मधील लोकांना घरपोच मिळणार अत्यावश्यक सामान - गौतम बुद्ध नगर हॉटस्पॉट

उत्तरप्रदेशच्या गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. वाय. यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले, की अत्यावश्यक वस्तू घरपोच पोहचवणाऱ्या लोकांना आम्ही हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्येदेखील जाण्यासाठी परवानगी देतो आहे. मात्र सोसायटीमधील नागरिकांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

Home delivery of essential items allowed in Noida hotspots: DM
आता 'हॉटस्पॉट'मधील लोकांना घरपोच मिळणार अत्यावश्यक सामान..
author img

By

Published : Apr 11, 2020, 4:31 PM IST

लखनऊ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील बऱ्याच ठिकाणांना 'हॉटस्पॉट' घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागांमध्ये अगदी अत्यावश्यक सेवांसाठीही घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशामुळे बऱ्याच लोकांनी तक्रार केल्यानंतर, या भागामधील लोकांना अत्यावश्यक गोष्टी घरपोच पोहचवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशच्या गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास एल. वाय. यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले, की अत्यावश्यक वस्तू घरपोच पोहचवणाऱ्या लोकांना आम्ही हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्येदेखील जाण्यासाठी परवानगी देतो आहे. मात्र सोसायटीमधील नागरिकांनी यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. त्यामुळे नोएडामधील लोकांना दिलासा मिळाला आहे.

  • Dear residents, for doorstep delivery inside the hotspots for today, we have allowed home delivery personnel (of essential goods only) to enter inside the main gate of society premises. Request RWA’s and residents to ensure social distancing

    — DM G.B. Nagar (@dmgbnagar) April 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने १३ भागांना हॉटस्पॉट घोषित करून सील केले आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी १५ जिल्ह्यांमधील हॉटस्पॉट सील करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; केजरीवालांनी दिले संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.