ETV Bharat / bharat

गेल्या २४ तासात देशात १७ हजार २९६ कोरोनाबाधित रुग्णांची भर, तर ४०७ जणांचा मृत्यू - देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी

कोरोना महामारीने बाधित रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या रुग्णांची एकूण संख्या ४ लाख ९० हजार ४०१ इतकी झाली आहे.

COVID19 positive cases reported in India
कोरोनाचा कहर
author img

By

Published : Jun 26, 2020, 10:18 AM IST

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा विळखा दिवसेंदिवस अधिक वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात देशभरात एकूण तब्बल १७ हजार २९६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच २४ तासामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला आहे. गेल्या २४ तासात तब्बल ४०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली या राज्यात मोठ्या प्रमाणात या विषाणूचा फैलाव झाला आहे. गेल्या २४ तासातील आकडेवारीनंतर देशभरात आतापर्यंत तब्बल ४ लाख ९० हजार ४०१ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २ लाख ८५ हजार ६३७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर अद्याप १ लाख ८९ हजार ४६३ अॅक्टिव्ह केसेस उपचार घेत आहेत. या महामारीमुळे देशात आतापर्यंत तब्बल १५ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सर्वाधिक बाधित रुग्ण-

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात गुरुवारी ४ हजार ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या राज्यात ६३ हजार ३४२ रुग्णांवर (अॅक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तसेच महाराष्ट्रात गुरुवारी ३ हजार ६६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या ७७ हजार ४५३ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.४२ टक्के इतके झाले आहे. यासोबतच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.