ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासात आढळले 5 हजार 242 कोरोनाबाधित, तर 157 जणांचा बळी

महाराष्ट्रामध्ये 33 हजार 53 कोरोनाबाधित असून 1 हजार 198 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 11 हजार 379 कोरोनाबाधित असून 659 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 10 हजार 54 कोरोनाबाधित तर 160 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये 11 हजार 224 कोरोनाबाधित तर 78 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

#COVID19
#COVID19
author img

By

Published : May 18, 2020, 11:41 AM IST

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 90 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 5 हजार 242 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 157 जण दगावले आहेत. आतापर्यंत 24 तासांत बाधित रुग्ण आढळलेला हा सर्वांत मोठा आकडा आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 96 हजार 169 झाला आहे, यात 56 हजार 316 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 36 हजार 823 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 3 हजार 29 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 33 हजार 53 कोरोनाबाधित असून 1 हजार 198 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 11 हजार 379 कोरोनाबाधित असून 659 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 10 हजार 54 कोरोनाबाधित तर 160 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये 11 हजार 224 कोरोनाबाधित तर 78 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. यासाठी सरकार परप्रांतीय कामगार आणि परदेशातून परत आलेल्यांची कोरोना चाचणी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' द्वारे करणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ग्रीन झोनमध्ये परत जाणाऱया लोकांसाठी 'आरटी-पीसीआर' आधारित 'पूल टेस्टिंग' संबंधी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. गृह मंत्रालयाने लॉकडाऊन 4.0 बाबत गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. राज्यांतील कोरोना रुग्णांच्या परिस्थितीनुसार 5 झोन तयार करण्यात आले आहेत. ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन, कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन असे 5 झोन असणार आहे. कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागात शॉपिंग मॉल वगळता इतर दुकानं सुरु करता येऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.