ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांमध्ये आढळले तब्बल 61 हजार 537 नवे रुग्ण - latest corona count india

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 झाला आहे, यात 6 लाख 19 हजार 88 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 14 लाख 27 हजार 6 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 42 हजार 518 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 8, 2020, 10:54 AM IST

नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. देशातील कोरोनाबाधितांनी 20 लाखाचा आकडा पार केला आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 61 हजार 537 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 933 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 88 हजार 612 झाला आहे, यात 6 लाख 19 हजार 88 अॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 14 लाख 27 हजार 6 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 42 हजार 518 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

महाराष्ट्रामध्ये 1 लाख 45 हजार 889 सक्रिय रूग्ण असून 17 हजार 92 जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासांत 119 नव्या मृतांची नोंद झाली असून एकूण आकडा 4 हजार 690 वर पोहचला आहे. तर गुजरातमध्ये 2 हजार 605 जणांचा मृत्यू झाला आहे. या पाठोपाठ दिल्लीमध्ये 4 हजार 82 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कर्नाटकामध्ये आतापर्यंत 2 हजार 998 जणांचा बळी गेला आहे.

दरम्यान देशभरामध्ये आतापर्यंत 2,33,87,171 कोरोना चाचण्या केल्या आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 5,98,778 कोरोना चाचण्या केल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने याबाबत माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.