ETV Bharat / bharat

जगातील 'या' बड्या राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण - जागतिक कोरोना अपडेट

जगभरातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. तसेच, हे संपूर्ण जगावर मोठे संकट असल्याचे म्हटले आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Oct 2, 2020, 8:59 PM IST

हैदराबाद - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अमेरिका, यूके, जपान, सिंगापूर, इटली, फ्रान्स, रशिया, स्पेन, भारत, पाकिस्तान, इराण, दक्षिण कोरिया अशा देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. अनेक देशांच्या प्रमुखांना कोरोनाची बाधा झाली आहे.

या नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण -

बोरीस जॉन्सन - इंग्लडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना 27 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. ते आपल्या घरामध्ये क्वारंटाइन झाले होते. मात्र, प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते तीन दिवस आयसीयूमध्ये होते.

प्रिन्स चार्ल्स - प्रिन्स चार्ल्स यांची 25 मार्चला कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ते 30 मार्चपर्यंत आयसोलेशनमध्ये होते. ते अद्यापही सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत.

जैर बोलसोनारो - ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांना 7 जुलैला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुन्हा त्यांना दोनदा कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण होण्याआधी बोलसोनारो अनेक वेळा गर्दीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गेलेले होते. अनेक वेळा त्यांनी मास्कही घातले नव्हते.

रशियाचे पंतप्रधान - मिखाइल मिशुस्तिन यांना 30 मार्चला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वत:ला सेल्फ आयसोलेट केले होते. जानेवरीमध्ये त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली होती.

व्लादिमिर याकुशेव - रशियाचे बांधकाम मंत्री व्लादिमिर याकुशेव यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

ईराणच्या नेत्यांना कोरोनाची लागण - ईराणच्या उपराष्ट्रपती मासूमेह इब्तेकार यांना 27 फेब्रुवरीला कोरोनाची लागण झाली होती. त्या घरामध्ये आयसोलेट झाल्या होत्या. तसेच इराणचे उप-आरोग्य मंत्री इराज हरिची - इराज हरिची यांना कोरोनाची लागण झाली होती.

फ्रेंच - सांस्कृतिक मंत्री फ्रँक रायस्टर यांनाही मार्चमध्ये कोरोनाची लागण झाली होती.

पीटर डटन - ऑस्ट्रेलियाचे गृहमंत्री पीटर डटन यांना 13 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

स्पेन - उपपंतप्रधान कारमेन कॅल्वो यांनाही 25 मार्चला कोरोना विषाणूची लागण झाली होती.

इस्राईल - कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे पंतप्रधान यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. तसेच इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली होती

होंडुरास - राष्ट्राध्यक्ष जुआन ऑरलँडो हर्नान्डेज यांना कोरोनाची लागण झाली होती.

जीनिन अनेझ - बोलिव्हियाचे अध्यक्ष जीनिन अनेझ यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्या घरीच क्वारंटाइन झाल्या होत्या.

मिशेल बार्निअर - ब्रेक्झिटमधील प्रमुख तडजोड करणारे मिशेल बार्निअर यांनाही

अमेरिका राष्ट्राध्यक्ष - डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्रम्प यांनी ट्विट करत सांगितले.

तथापि, चीनच्या वूहानमधून पसरलेल्या कोरोनाविषाणूचा विळखा घट्ट होत चालला आहे. गेल्या 24 तासात जगभरामध्ये 3 लाख 12 हजार 924 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 79 हजार 555 वर पोहचली आहे. तर 8 हजार 782 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 10 लाख 27 हजार 653 वर पोहचली आहे. अमेरिकेत 74 लाख 94 हजार 371 जण बाधित झाले असून 2 लाख 12 हजार 660 जणांचा मुत्यू झाला आहे. तर भारत जगात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत दुसऱ्या स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.