ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये मुंबई ते अलाहाबाद प्रवास.. व्यापाऱ्याने लढवली भन्नाट शक्कल

अलाहाबाद येथील मुळ रहिवासी असलेले प्रेम मूर्ती हे मुंबई येथे काम करतात. त्यांनी लॉकडाऊनची पहिली पायरी मुंबईत पूर्ण केली. मात्र, लॉकडाऊनचे नियम वाढतच गेल्याने त्यांनी ही कांद्याची शक्कल लढवत आपले गाव गाठले. मात्र, याच शकलीने ते कांद्याचे व्यापारी बनले आहेत.

author img

By

Published : Apr 26, 2020, 12:29 PM IST

Have onions, will travel: Mumbai man turns to vegetable trade to beat lockdown
लॉकडाऊनमध्ये मुंबई ते अलाहाबाद प्रवास करण्यासाठी व्यापाऱ्याची भन्नाट शक्कल

अलाहाबाद - जर तुम्हाला लॉकडाऊनमध्ये मुंबई ते अलाहाबाद प्रवास करायचा असेल, तर तुम्ही कसा करणार? सोप्पं आहे, २५ टन कांदे खरेदी करा, ते ट्रकमध्ये भरा आणि प्रवास पूर्ण करा. चकित झालात ना? पण असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीने केला आहे. आपल्या गावाकडे जाण्याची ओढ आणि गावाकडे जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने प्रेम मूर्ती पांडे या व्यक्तीने ही भन्नाट शक्कल लढवली आहे.

अलाहाबाद येथील मुळ रहिवासी असलेले प्रेम मूर्ती हे मुंबई येथे काम करतात. त्यांनी लॉकडाऊनची पहिली पायरी मुंबईत पूर्ण केली. मात्र, लॉकडाऊनचे नियम वाढतच गेल्याने त्यांनी ही कांद्याची शक्कल लढवत आपले गाव गाठले. मात्र, याच शक्कलीने ते कांद्याचे व्यापारी बनले आहेत.

होय, अंधेरी पूर्व येथील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या प्रेम मूर्ती यांनी सांगितले, की 'मी ज्या परिसरात राहतो, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून लॉकडाऊनमध्ये संपूर्ण वाहतूक बंद केली आहे. मात्र, सरकारने जीवनावश्यक असलेल्या वस्तू पुरवठा करण्याची परवानगी दिली होती. यामध्ये भाजीपाला, फळं यांचा समावेश होता. त्यामुळे याच पर्यायाचा वापर करण्याचा मी निर्णय घेतला'.

प्रेम मूर्ती यांनी सुरुवातीला १३०० किलो टरबूजांची देखील खरेदी केली होती. १७ एप्रिलला त्यांनी नाशिकच्या पिंपळगावमधून एक लहान ट्रक भाड्याने घेतला. त्यानंतर १० हजार किमतीचे टरबूज खरेदी करून मुंबईला हा ट्रक पाठवून दिला. तिथे त्यांनी अगोदरच ग्राहकांशी संपर्क साधलेला होता. पुढे त्यांनी पिंपळगाव बाजारातून कांदे खरेदी केले. त्यांनी सांगितले, की त्यांनी ९ रुपये प्रती किलो या दराने २५ हजार ५२० किलो किमतीचे कांदे खरेदी केले होते. यामधून त्यांनी जवळपास २.३२ लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर त्यांनी ७७ हजार ५०० रुपये देऊन एक ट्रक भाड्याने घेतला. २० एप्रिलला त्यामध्ये कांदे भरुन त्यांनी अलाहाबाद पर्यंत १२०० किलोमीटर प्रवास पूर्ण केला.

२३ एप्रिल रोजी ते अलाहाबादला पोहचले. त्यानंतर मुंडेरा येथील किरकोळ बाजारात ते हे कांदे घेऊन गेले. मात्र, तिथे त्यांना पैसे देऊन कांदे विकत घेणारा कोणी भेटला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे गाव कोटवा मुबारकपूर गाठले.

टीपी नगर पोलीस स्टेशनचे पोस्ट इन्चार्ज अरविंद कुमार सिंग यांनी याबाबत सांगितले, की प्रेम मूर्ती पांडे हे धुमनगंज पोलीस स्टेशनमध्ये आले होते. शुक्रवारी त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. सध्या त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.