नवी दिल्ली - हाथरस बलात्कार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्कीही झाली. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी संताप व्यक्त केला. 'उत्तर प्रदेश कुणाच्या बापाचे नाही', असे हार्दिक पटेल म्हणाले.
'मग्रुरपणामुळे राजकारणाचा अंत होतो. उत्तर प्रदेशचे 'जंगल राज' मध्ये रुपांतर झाले असून महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. दिवसेंदिवस महिलांवरील आत्याचाराच्या घटना वाढत आहेत. सरकार आणि पोलीस हात बांधून तमाशा पाहत आहेत. लोकांचा आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींनाही ताब्यात घेतले आहे, उत्तर प्रदेश कुणाच्या बापाचा नाही', असे टि्वट हार्दिक पटेल यांनी केले आहे.
-
अहंकार राजनीति का अंत हैं, उत्तर प्रदेश को जंगल राज बनाया गया हैं। महिलाओं की सुरक्षा ख़तरे में है, हर दिन महिलाओं के साथ दुष्कर्म होते हैं। सरकार और पुलिस तमाशा देख रही हैं। लोगों की आवाज़ उठा रहे राहुल गांधी जी को हिरासत में लिया जाता हैं। उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) October 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">अहंकार राजनीति का अंत हैं, उत्तर प्रदेश को जंगल राज बनाया गया हैं। महिलाओं की सुरक्षा ख़तरे में है, हर दिन महिलाओं के साथ दुष्कर्म होते हैं। सरकार और पुलिस तमाशा देख रही हैं। लोगों की आवाज़ उठा रहे राहुल गांधी जी को हिरासत में लिया जाता हैं। उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) October 1, 2020अहंकार राजनीति का अंत हैं, उत्तर प्रदेश को जंगल राज बनाया गया हैं। महिलाओं की सुरक्षा ख़तरे में है, हर दिन महिलाओं के साथ दुष्कर्म होते हैं। सरकार और पुलिस तमाशा देख रही हैं। लोगों की आवाज़ उठा रहे राहुल गांधी जी को हिरासत में लिया जाता हैं। उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं।
— Hardik Patel (@HardikPatel_) October 1, 2020
आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना त्यांना यमुना एक्स्प्रेस पोलिसांनी थांबवले. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्ती राहुल गांधी जमिनीवर पडले. यावर काँग्रेस नेत्यांकडून योगी आदित्यानाथ यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
तथापि, साथीच्या आजार कायद्याचे उल्लघंन केल्यामुळे आम्ही त्यांना इथेच थांबावलं आणि पुढे जाऊ दिले नाही, असे अतिरिक्त जिल्हा पोलीस आयुक्त रणविजय सिंग यांनी सांगितले. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.