ETV Bharat / bharat

पाकिस्तानची 'ना'पाक हरकत..भारतीय दूतावासाच्या आयोजित इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना धमकावले - pakistan

पुलवामा हल्ल्यांनतर दोन देशांतील ताणलेले संबंध नुकतेच निवळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पाकिस्तानच्या अशा कुरापतींनी पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

भारतीय दूतावासाच्या आयोजित इफ्तार पार्टीतील पाहुण्यांना धमकावले
author img

By

Published : Jun 2, 2019, 4:49 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासद्वारे आयोजित एका इफ्तार पार्टीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आमंत्रित पाहुण्यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एवढ्यावर न थांबता पाहुण्यांना कार्यक्रमातून हाकलून लावले. शनिवारी (दि. १ जून) रात्री ही घटना घडली.

इस्लामाबादमधील सेरेना या हॉटेलमध्ये भारतीय दूतावासाद्वारे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय दूतावासाच्या वतीने अनेक पाकिस्तानी तसेच भारतीय पाहुण्यांना आमंत्रण दिले होते. या पार्टीच्या वेळी काही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात शिरून बेशिस्त वर्तन करण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतीय दूतावासाने आमंत्रित केलेल्या काही पाहुण्यांना धमकावण्यास सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता त्यांनी या अधिकाऱ्यांनी पाहुण्यांना पार्टीतून बाहेर काढले. शिवाय इतर आमंत्रितांच्या घरी जाऊन या पार्टीत सहभागी न होण्यासाठी धमक्या दिल्या.

पाकिस्तानातील भारतीय राजदूत अजय बिसारिया यांनी या घटनेचा निषेध केला. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी अशा घटना घडणे अनुकुल नसल्याचे त्यांनी सांगितले. हा केवळ राजनैतीक शिष्टाचाराचा भंग नसून दोन देशांतील संबंधांवर परिणाम करणारा प्रकार असल्याचे ते म्हणाले. पार्टीत पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या वाईट वागणुकीला सामोरे जावे लागलेल्या पाहुण्यांचीही त्यांनी माफी मागितली.

काही दिवसांपूर्वी लाहोर गुरूद्वारा पाडण्याच्या घटनेवेळीही भारतीय दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २० मिनेटे ओलीस ठेवले होते. तसेच या परिसरात पुन्हा न येण्याचा इशारा दिला होता.

भारतातील पाकिस्तानी दूतावासानेही दिल्लीत एका इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यात अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती, लेखक, कलाकार आणि पाकिस्तानी विद्यार्थी सहभागी झाले होते. पुलवामा हल्ल्यांनतर दोन देशांतील ताणलेले संबंध नुकतेच निवळण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पाकिस्तानच्या अशा कुरापतींनी पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.