चंदिगड - भारत पाकिस्तानातील शीखांचे पवित्र स्थळ जोडणाऱया कर्तारपूर कॉरिडॉरचे रखडलेले काम सुरू झाले आहे. ठेकेदार आणि कामगारांमध्ये पैशावरून काही वाद निर्माण झाली होता. तो सोडवण्यात आला असून रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे.
हेही वाचा - कर्नाटकमध्ये नारळापासून बनवली चक्क 30 फूट उंच गणेश मूर्ती
पाकिस्तानातील शिखांचे पवित्र स्थान दरबार सिंग गुरूद्वारा ते भारतातील डेरा बाबा नानक गुरूद्वारा कर्तारपूर कॉरिडॉरने जोडले जाणार आहेत. कामगार आणि ठेकादारामध्ये पैशावरुन निर्माण झालेली अडचण सोडवण्यात आली आहे, असे या कॉरिडॉरचे काम पाहणारे अधिकारी जोगिंदर सिंह यांनी सांगितले.
हेही वाचा - काश्मीरमध्ये राहत असलेल्या आजारी सासू-सासऱ्यांशी २२ दिवसांपासून संपर्क नाही - उर्मिला मातोंडकर
दरम्यान, भारत-पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात आज (शुक्रवार) झिरो पॉईंटवर तांत्रिक बैठक होणार आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. तरीही या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - झिरो पॉईंटवर पार पडणार भारत-पाक दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर बैठक
पाकिस्तानातील गुरदासपूर जिल्ह्यात असणारा डेरा बाबा नानक साहिब येथे शिख बांधवांना जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉरमुळे मोठी मदत मिळणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन्ही देशांनी कॉरिडॉरला मंजुरी दिली होती. नोव्हेंबर २०१९ पूर्वी गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीपूर्वी कॉरिडॉरचे टर्मिनल्स पूर्ण करण्याची योजना आहे.
१५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात आहे.