नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात आज (शुक्रवार) झिरो पॉईंटवर तांत्रिक बैठक होणार आहे.
-
Technical meeting between India and Pakistan on Kartarpur Corridor to be held today at the Zero Point of #KartarpurCorridor. https://t.co/sYvY8Io6bd
— ANI (@ANI) August 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Technical meeting between India and Pakistan on Kartarpur Corridor to be held today at the Zero Point of #KartarpurCorridor. https://t.co/sYvY8Io6bd
— ANI (@ANI) August 30, 2019Technical meeting between India and Pakistan on Kartarpur Corridor to be held today at the Zero Point of #KartarpurCorridor. https://t.co/sYvY8Io6bd
— ANI (@ANI) August 30, 2019
भारतातील शीख भाविकांना कर्तारपूर साहिब येथे जाण्यासाठी आता व्हिसाची गरज लागणार नाही. दररोज जवळपास पाच हजार भाविक कर्तारपूर साहिब येथे जाऊन दर्शन घेऊ शकतात.
हे ही वाचा - सपा नेते आजम खान यांच्यावर म्हशी चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल
पाकिस्तानातील गुरदासपूर जिल्ह्यात असणारा डेरा बाबा नानक साहिब येथे शिख बांधवांना जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉरमुळे मोठी मदत मिळणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन्ही देशांनी कॉरिडॉरला मंजुरी दिली होती. नोव्हेंबर २०१९ पूर्वी गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीपूर्वी कॉरिडॉरचे टर्मिनल्स पूर्ण करण्याची योजना आहे.
हे ही वाचा - कर्नाटकमध्ये नारळापासून बनवली चक्क 30 फूट उंच गणेश मूर्ती
१५२२ मध्ये गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा स्थापन केले तसेच इथेच त्यांनी आपला शेवटचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण खूपच महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात आहे.