ETV Bharat / bharat

हज २०२०: यात्रा रद्द करणाऱ्यांनी बुकिंगची रक्कम मिळवण्यासाठी अर्ज करावे - जम्मू-काश्मीर हज समिती

author img

By

Published : Jun 8, 2020, 9:39 AM IST

जम्मू-काश्मीर हज समितीने, २०२० या वर्षी हज यात्रा रद्द करु इच्छित असलेल्या लोकांनी, आपले पैसै रिफंड मिळवण्यासाठी अर्ज करावे, असे सांगितले आहे. हज कमिटी ऑफ इंडिया आणि बेमिना हज हाऊसच्या वेबसाईटवरून हा अर्ज करता येणार आहे.

Haj 2020: J-K Haj Committee asks pilgrims to apply for refund
हज २०२०: यात्रा रद्द करणाऱ्यांनी बुकिंगची रक्कम मिळवण्यासाठी अर्ज करावे - जम्मू-काश्मीर हज समिती

श्रीनगर - कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम धार्मिक यात्रांवरही झाला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हज यात्रेवरुनही आता संभ्रम निर्माण झाला आहे. अशात जम्मू-काश्मीर हज समितीने, २०२० या वर्षी हज यात्रा रद्द करु इच्छित असलेल्या लोकांनी, आपले पैसै रिफंड मिळवण्यासाठी अर्ज करावे, असे सांगितले आहे. हज कमेटी ऑफ इंडिया आणि बेमिना हज हाऊसच्या वेबसाईटवरून हा अर्ज करता येणार आहे.

भारतीय हज समितीने सांगितल्याप्रमाणे, ज्यांना हज यात्रेची बुकिंग रद्द करायची असेल त्यांना १०० टक्के रिफंड दिला जाईल. यासाठी कॅन्सलेशन फॉर्म भरून हज कमिटीला ईमेल करता येईल. सोबतच, पासबुकची कॉपी किंवा कॅन्सल चेक सुद्धा या ईमेलला जोडावा लागणार आहे.

कोरोना व्हायरसचे वाढते संक्रमण पाहता सौदी अरेबिया सरकारने मार्चमध्ये सांगितले होते की, यावर्षी हज यात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. भारतीय हज कमिटीने सांगितल्याप्रमाणे, सौदी अरेबियाकडून अद्याप काहीच नवीन अपडेट मिळाले नाही. यासंदर्भात अनेक जणांकडून चौकशी केली जात आहे. त्यामुळे, ज्यांना हज यात्रा रद्द करायची आहे त्यांनी ती रद्द करून रिफंड घ्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनामुळे जगभरातील धार्मिक स्थळांना बंद ठेवण्यात आले आहे. त्याचाच परिणाम सौदी अरेबियातील मक्का आणि मदिनावर सुद्धा झाला आहे. यापूर्वी 1798 मध्ये हज यात्रा रद्द करण्यात आली होती.

हेही वाचा - जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू

हेही वाचा - सात महिन्यांची गर्भवती कमांडो देत होती नक्षलविरोधी लढा, गोंडस मुलीला दिला जन्म

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.