नवी दिल्ली - हॅकर्सनी गुप्त माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने 100 हून अधिक हाय प्रोफाइल व्यक्तींवर सायबर हल्ल्याची केल्याचे सांगताना आता ही मालिका मायक्रोसॉफ्टने थांबविली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. यात हॅकर्सनी माजी राजदूतांसह ज्येष्ठ धोरण तज्ज्ञांच्या खात्यांना लक्ष्य केले होते.
इराणी हल्लेखोर फॉस्फोरसने सौदी अरेबियामध्ये होणाऱ्या आगामी म्यूनिच सुरक्षा परिषद आणि थिंक 20 (टी 20) शिखर परिषदेच्या संभाव्य सहभागींना लक्ष्य केले होते.
म्यूनिच सुरक्षा परिषद ही सुरक्षेच्या विषयासंबंधी विविध राष्ट्रांच्या सुरक्षा प्रमुखांदरम्यान आणि जगातील इतर नेत्यांदरम्यान होणारी सर्वात महत्वाची बैठक आहे. मागील जवळजवळ 60 वर्षांपासून ही बैठक सातत्याने होत आहे. त्याचप्रमाणे जी 20 देशांसाठी धोरणात्मक कल्पना तयार करणारा थिंक 20 हा देखील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.
'सध्याच्या विश्लेषणाच्या आधारे आम्हाला असे वाटत नाही की, ही क्रिया अमेरिकन निवडणुकांशी कोणत्याही प्रकारे संबंधित आहे,' असे मायक्रोसॉफ्टमधील कस्टर सिक्युरिटी अँड ट्रस्टचे उपाध्यक्ष टॉम बर्ट म्हणाले.
हेही वाचा - वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ,पण...
हल्लेखोर या कार्यक्रमांना उपस्थित संभाव्य अतिथींना ईमेलद्वारे बनावट मेल पाठवत होते. हे ईमेल इंग्रजीत होते आणि ते माजी सरकारी अधिकारी, धोरण तज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि अशासकीय संस्थांच्या नेत्यांना पाठविण्यात आले होते.
बर्ट यांनी शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'आमची पक्की खात्री आहे की, हे हल्ले गुप्त माहिती मिळवण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. हल्ल्यात बळी पडलेल्यांमध्ये माजी राजदूत आणि इतर ज्येष्ठ धोरणज्ज्ञ होते ज्यांना आपापल्या देशांमध्ये जागतिक अजेंडा आणि परराष्ट्र धोरण तयार करायचे होते.'
मायक्रोसॉफ्टच्या 'थ्रेट इंटलिजन्स सेंटर' किंवा एमएसटीआयसीने ही बाब उघडकीस आणली. मायक्रोसॉफ्टने असे म्हटले आहे की, व्यवसाय आणि वैयक्तिक ईमेल खात्यांमध्ये नेहमीप्रमाणे बहु-घटक प्रमाणीकरणाची अंमलबजावणी केल्यास अशा हल्ल्यांना यशस्वीरित्या प्रतिबंध होईल.
हेही वाचा - भारतात फोनपेचे 25 कोटी वापरकर्ते