पाटणा- बिहार शिक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट हॅक झाल्याची घटना रविवारी घडली. वेबसाईटवर पाकिस्तानची स्तुती करणारा मजकूर झळकत होता. त्यामुळे बिहार शिक्षण विभागाने तात्काळ ही वेबसाईट बंद केली आहे.
'रूटआयलिडीझ तुर्की हॅकर'ने या हॅकींगची जबाबदारी घेतली आहे. या हॅकरने पाकिस्तान आणि इस्लामची स्तुती करणारा मजकूर वेबसाईटवर पोस्ट केला होता. त्यामुळे सायबर विभागाकडून याचा शोध घेतला जात आहे.
वेबसाईट हॅक होताच साईट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे साईट सर्च केल्यास HTTP त्रुटी 503 संदेश येत आहे. मात्र, साईट पूर्णपणे नष्ट करण्यात आलेली नाही.