ETV Bharat / bharat

२०० कोटीच्या विवाहसोहळ्यानंतर कचऱ्याचे साम्राज्य; गुप्ता कुटुंबाला सफाईचा खर्च देण्याचा आदेश - साम्राज्य

आतापर्यंत १५० क्विंटल कचरा साफ करण्यात आला आहे. सर्व सफाई झाल्यानंतर खर्चाचे बिल गुप्ता कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. गुप्ता कुटुंबही यासाठी तयार आहे.

कचरा साफ करताना कामगार
author img

By

Published : Jun 25, 2019, 8:29 AM IST

ऑली - उत्तराखंड येथील ऑली येथे अजय गुप्ता यांचा मुलगा सुर्यकांत याचा विवाहसोहळा पार पडला होता. या विवाहसोहळ्यासाठी तब्बल एक दोन नव्हे तर, २०० कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. या विवाहसोहळ्याची भारतासह जगभर चर्चा झाली. परंतु, विवाहसोहळ्यानंतर येथे कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

विवाहसोहळा झाल्यानंतर कचरा साफ करण्यासाठी महापालिकेने २० कामगारांना कामाला लावले आहे. गुप्ता कुटुंबियांनी यासाठी ५४ हजार रुपये दिले आहेत. आतापर्यंत १५० क्विंटल कचरा साफ करण्यात आला आहे. सर्व सफाई झाल्यानंतर खर्चाचे बिल गुप्ता कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. गुप्ता कुटुंबही यासाठी तयार आहे. त्यांनी मदत करण्यासाठी महापालिकेला वाहनाची मदतही पुरवली आहे, अशी माहिती शैलेंद्र पनवर यांनी दिली आहे.

मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विवाहसोहळ्याच्या तयारीमुळे ऑली येथील पर्यावरणाला धोका पोहचत आहे, अशी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यासंबंधी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाला यासंबंधी ७ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर ८ जुलैला याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

विवाहसोहळ्यासाठी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, बॉलीवूड कलाकार आणि योगगुरू रामदेव बाबा विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी बाबांनी २ तासांसाठी योगाचे प्रशिक्षण शिबीरही घेतले होते. पाहुण्यांची ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा बंदोबस्त करण्यात आला होता. पाहुण्यांसाठी ऑली येथील जवळपास सर्वच हॉटेल आणि रिसॉर्टचे बुकींग करण्यात आले होते. विवाहसोहळ्याच्या सजावटीसाठी स्वित्झर्लंडवरुन फुले मागवण्यात आली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.