गांधीनगर - देशामध्ये नागरिकत्व सुधारणा काद्याविरोधात आंदोलन सुरू असून अनेक हिंसाच्या घटना घडत आहेत. तर याच दरम्यान एका पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. द्वारकाचे जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार यांनी टि्वट करून याबाबत माहिती दिली आहे.
-
અરજદાર શ્રી હસીનાબેન અબ્બાસઅલી વરસારીયાને ભારતીય નાગરિકતા પ્રમાણપત્ર આજરોજ આપવામાં આવ્યું.@CMOGuj @HMofficeGujarat @pkumarias pic.twitter.com/g7Zd5NZkZh
— Collector Dwarka (@COLLECTORDWK) 18 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">અરજદાર શ્રી હસીનાબેન અબ્બાસઅલી વરસારીયાને ભારતીય નાગરિકતા પ્રમાણપત્ર આજરોજ આપવામાં આવ્યું.@CMOGuj @HMofficeGujarat @pkumarias pic.twitter.com/g7Zd5NZkZh
— Collector Dwarka (@COLLECTORDWK) 18 December 2019અરજદાર શ્રી હસીનાબેન અબ્બાસઅલી વરસારીયાને ભારતીય નાગરિકતા પ્રમાણપત્ર આજરોજ આપવામાં આવ્યું.@CMOGuj @HMofficeGujarat @pkumarias pic.twitter.com/g7Zd5NZkZh
— Collector Dwarka (@COLLECTORDWK) 18 December 2019
गुजरातमधील द्वारका येथे हसीनाबेन अब्बासअली वरसारीया या पाकिस्तानी महिलेला भारतीय नागरिक्तव देण्यात आले आहे. हसिना या मूळ भारतीय आहेत. एका पाकिस्तानी नागरिकाशी लग्न केल्यानंतर 1999 ला त्या पाकिस्तानला स्थलांतरित झाल्या होत्या.
दरम्यान पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या भारतामध्ये परतल्या. गेल्यावर्षी त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. अखेर बुधवारी त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. सरकारने विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे द्वारकाचे जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार यांनी सांगितले.
नागरिकात सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत.