गांधीनगर - गुजरात सरकारने 'गायीं'वर आधारित 'सेंद्रीय शेती' करणाऱ्या शेतकऱ्यांना दर महिन्याला नऊशे रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
अर्थमंत्री नितीन पटेल यांनी 2020-21 वर्षासाठी 2 लाख 17 हजार287 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये या योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सरकार ५० हजार शेतकऱ्यांपर्यंत मदतनिधी पोहोचवणार आहे.
'कीटकनाशके आणि रासायनिक खतांच्या गरजेपेक्षा अधिक वापरामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि ते अजूनही होत आहे. सध्याच्या काळात नैसर्गिक आणि सेंद्रीय पद्धतीने शेती करून घेतलेल्या उत्पादनांना असलेल्या मागणीत वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन सरकारतर्फे 'गायी'वर आधारित सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही 50 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करत आहोत,' असे पटेल म्हणाले.
हेही वाचा - 'विदेशी गुंतवणूक वाढणार असल्यानं, भारत लवकरच ब्रिटन आणि जर्मनीला मागे टाकणार'
अशा पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दर महिन्याला मिळणार नऊशे रुपयांचा मदत निधी देईल, असे अर्थमंत्री पटेल म्हणाले.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार : केंद्र सरकारवर रजनीकांत भडकले, म्हणाले...