ETV Bharat / bharat

नोव्हेंबर महिन्यात जीएसटी उत्पन्नाने पार केला १ लाख कोटींचा टप्पा - वस्तू सेवा कर

वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटीचे मागील तीन महिन्यातील महसूली उत्पन्न रोडावले होते. मात्र, चालू आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यात जीएसटीने १ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

GST
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Dec 1, 2019, 4:22 PM IST

नवी दिल्ली - वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटीचे मागील तीन महिन्यातील महसूली उत्पन्न रोडावले होते. मात्र, चालू आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यात जीएसटीने १ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. या नोव्हेंबर महिन्यात जीएसटी उत्पन्नाने ६ टक्के वाढ नोंदवली आहे.

ऑक्टोबर महिन्यात जीएसटीद्वारे ९५ हजार ३८० कोटी उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा झाले होते. तर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ९७ हजार ६३७ कोटी उत्पन्न जमा झाले होते. एकून १ लाख ३ हजार ४९२ कोटी जीएसटीपैकी केंद्रिय जीएसटी १९ हजार ५९२ कोटी, राज्य जीएसटी २७ हजार १४४ कोटी, एकात्म( इंटीग्रेटेड) जीएसटी ४९ हजार २८ कोटी, सेस ७ हजार ७२७ कोटी (८६९ कोटी निर्यातीतून मिळालेले उत्पन्न धरुन) जमा झाले आहे, असे सरकारने जाहीर केले आहे.३ महिन्यांच्या नकारात्मक वाढीनंतर नोव्हेंबर महिन्यात जीएसटी उत्पनात चांगली वाढ नोंदवली गेली आहे. ६ टक्के जीएसटी महसूली उत्पन्नातील वाढ मागील वर्षीच्या नोव्हेंबरमधील वाढीपेक्षाही जास्त आहे. देशांतर्गत व्यवहारात नोव्हेंबर महिन्यात १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ चालू आर्थिक वर्षातील सर्वात जास्त वाढ आहे.

Intro:Body:

नोव्हेंबर महिन्यात जीएसटी उत्पन्नाने पार केला १ लाख कोटींचा टप्पा

नवी दिल्ली - वस्तू सेवा कर म्हणजेच जीएसटीचे मागील तीन महिन्यातील महसूली उत्पन्न रोडावले होते. मात्र, चालू आर्थिक वर्षातील नोव्हेंबर महिन्यात जीएसटीने १ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. या नोव्हेंबर महिन्यात जीएसटी उत्पन्नाने ६ टक्के वाढ नोंदवली आहे.

ऑक्टोबर महिन्यात जीएसटीद्वारे ९५ हजार ३८० कोटी उत्पन्न सरकारी खजिन्यात जमा झाले होते. तर मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ९७ हजार ६३७ कोटी उत्पन्न जमा झाले होते.   

एकून १ लाख ३ हजार ४९२ कोटी जीएसटीपैकी केंद्रिय जीएसटी १९ हजार ५९२ कोटी, राज्य जीएसटी २७ हजार १४४ कोटी, एकात्म( इंटीग्रेटेड) जीएसटी ४९ हजार २८ कोटी, सेस ७ हजार ७२७ कोटी (८६९ कोटी निर्यातीतून मिळालेले उत्पन्न धरुन) जमा झाले आहे, असे सरकारने जाहीर केले आहे.

३ महिन्यांच्या नकारात्मक वाढीनंतर नोव्हेंबर महिन्यात जीएसटी उत्पनात चांगली वाढ नोंदवली गेली आहे. ६ टक्के जीएसटी महसूली उत्पन्नातील वाढ मागील वर्षीच्या नोव्हेंबरमधील वाढीपेक्षाही जास्त आहे. देशांतर्गत व्यवहारात नोव्हेंबर महिन्यात १२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ चालू आर्थिक वर्षातील सर्वात जास्त वाढ आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.