ETV Bharat / bharat

बिहार महासंग्राम : नेत्यांची आश्वासने मोठ-मोठी; मात्र, सत्यपरिस्थिती वेगळीच - बिहार महासंग्राम

बिहार निवडणुकीदरम्यान 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने वैशालीच्या राधोपुर, रुस्तमपुर येथील इतर मागासवर्गीय लोकांसोबत संवाद साधला. यावेळी या लोकांनी सांगितले की, सरकारकडून गरिबांना देण्यात येणारे रेशनवाटप करणारे वितरक रेशन गिळत आहेत.

bihar election
बिहार महासंग्राम
author img

By

Published : Nov 1, 2020, 7:31 PM IST

वैशाली (बिहार) - राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत. एकीकडे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेतेमंडळी नोकरी आणि रोजगाराबाबत बोलत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणी भूखमारीसारखी परिस्थिती आहे. राधोपुर विधानसभा मतदासंघाच्या इतर मागासवर्गीय जमातीच्या लोकांनी जन वितरण प्रणालीच्या वितरकावर कमी रेशन देण्याचा आरोप केला आहे.

बिहार महासंग्राम : नेत्यांची आश्वासने मोठ-मोठी; मात्र, सत्यपरिस्थिती वेगळीच

बिहार निवडणुकीदरम्यान 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने वैशालीच्या राधोपुर, रुस्तमपुर येथील इतर मागासवर्गीय लोकांसोबत संवाद साधला. यावेळी या लोकांनी सांगितले की, सरकारकडून गरिबांना देण्यात येणारे रेशनवाटप करणारे वितरक रेशन गिळत आहेत.

रेशन वितरक -

येथील लोकांचे म्हणणे आहे की, सहा महिन्यांचे रेशन वितरक गिळून घेतात. येथे लोक भूखमरीमुळे मरत आहेत. मोदी जी म्हणाले होते की, लोकांना मोफतमध्ये रेशन देण्यात येईल. मात्र, येथील स्थिती अशी आहे की, दलाल रेशनचा भ्रष्टाचार करत आहेत. हे कुणाला माहितही नाही.

ईटीव्ही भारत प्रतिनिधीसोबत बोलताना एक वृद्ध म्हणाले की, सरकारकडून लोकांसाठी योजना बनवली जाते. मात्र, ती लोकपर्यंत पोहचत नाही. तसेच हे यामुळे होते की, कारण काही विभागातील अधिकारी भ्रष्टाचारी आहेत.

तेजस्वीवर जनतेचा आरोप -

तेजस्वी यादव राज्यातील जनतेने त्यांना एक संधी द्यावी, अशी मागणी करत आहेत. मात्र, ते जिथून आमदार आहेत, तेथील लोकांचे म्हणणे आहे की, 'ते मतदारसंघात येत नाहीत. तसेच येथील लोकांनी हा दावा केला आहे की, येथील गरीबांची परिस्थिती गंभीर आहे. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकणारा कोणीच नाही'.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.