श्रीनगर - जम्मू काश्मीर प्रशासनाने येथील सर्व फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षा काढलेल्या नेत्यांमध्ये मिरवाज उमर फारूख, शबीर शाह, हाशिम कुरेशी, बिलाल लोन आणि अब्दुल घनी भट यांचा समावेश आहे. पुलवामा येथे सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतर २ दिवस होऊन गेले असले तरिही जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली जमाव बंदी तशीच ठेवण्यात आलेली आहे. असे असले तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचा दावा केला आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्विकारलेली आहे. या आत्मघातकी हल्ल्यात सुरक्षा दलाच्या ४९ जवानांना वीरमरण आले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी सुरक्षा दलांना पूर्ण अधिकार दिल्याचे सांगत हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन दिले होते.