श्रीनगर - कलम ३७० हटवले गेल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी, परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांचे आणखी एक शिष्टमंडळ काश्मीर दौरा करणार आहे. साधारणपणे महिनाभरापूर्वीच अमेरिका आणि नॉर्वे देशांच्या राजदूतांसह पंधरा राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जम्मू आणि काश्मीरला भेट दिली होती.
यावेळी जम्मू काश्मीरला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात युरोपीय युनियन आणि आखाती देशांमधील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. युरोपीय संसदेत 'सीएए' आणि काश्मीर प्रकरणी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर, हा दौरा महत्त्वपूर्ण असणार आहे.
युरोपीय संसदेच्या ७५१ सदस्यांपैकी ६२६ इतक्या खासदारांच्या जबरदस्त बहुमताने काश्मीर आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याप्रश्नी थोड्याफार फरकाने वेगळ्या शब्दांत जोरदार टीका करणारे सहा ठराव दाखल करण्यात आले आहेत. यावर २ मार्चला सुरू होणाऱ्या युरोपीय महासंघाच्या संसदेच्या नव्या सत्रामध्ये मतदान घेतले जाणार आहे.
हेही वाचा : 'भारत आमचा अत्यंत निकटचा मित्र', मादागास्करचे संरक्षण मंत्री रोकोटोनिरिया रिचर्ड यांचे मत