ETV Bharat / bharat

आता भारतीयांना परदेशातूनही आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण करता येणार - केंद्रीय मोटर वाहन अधिनियम न्यूज

'रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे की, ज्या नागरिकांचे आंतरराष्ट्रीय ड्राइव्हिंग परमिट (आयडीपी) परदेशात असताना कालबाह्य झाले आहेत, अशा नागरिकांना (आयडीपी) देण्याच्या सुविधेसाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 मध्ये दुरुस्तीसाठी टिप्पणी आणि सूचना मागवत' असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण

author img

By

Published : Oct 10, 2020, 5:13 PM IST

नवी दिल्ली - ज्यांचे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) परदेशात असताना कालबाह्य झाले आहेत अशा नागरिकांना आयडीपी नूतनीकरणासाठी सुविधा सुरू करणार असल्याचे सरकारने शनिवारी सांगितले. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) अधिसूचना जारी केली आहे.

'रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे की, ज्या नागरिकांचे आंतरराष्ट्रीय ड्राइव्हिंग परमिट (आयडीपी) परदेशात असताना कालबाह्य झाले आहेत, अशा नागरिकांना (आयडीपी) देण्याच्या सुविधेसाठी केंद्रीय मोटर वाहन अधिनियम, 1989 मध्ये दुरुस्तीसाठी टिप्पणी आणि सूचना मागवत' असल्याचे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - 'वंदे भारत एक्सप्रेस' 15 ऑक्टोबरपासून धावणार

'परदेशात असलेल्या किंवा परदेश प्रवास करणाऱ्या काही नागरिकांच्या आयडीपीची मुदत संपली आहे आणि परदेशात नूतनीकरणाची कोणतीही व्यवस्था नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. अशा नागरिकांच्या सोयीसाठी सीएमव्हीआर 1989 मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे. नागरिक भारतीय दूतावास / मिशन परदेश पोर्टलमार्फत अर्ज करू शकतात आणि त्यानंतर संबंधित आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालये) विचारात घेण्याकरिता वाहनांकडे अर्ज दाखल करू शकतात,' असे या निवेदनात म्हटले आहे. देशातील आयडीपीसाठी विनंती करताना वैद्यकीय प्रमाणपत्रातील अटी काढून टाकणे आणि वैध व्हिसा समाविष्ट करणे या प्रस्तावांचाही समावेश आहे.

नागरिक आणि भागधारक आपल्या टिप्पणी व सूचना सचिव (एमव्हीएल, आयटी आणि टोल), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे 30 दिवसांच्या आत पाठवू शकतात, असे यात म्हटले आहे.

हेही वाचा - पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारांची तस्करी, जवानांनी उधळला कट

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.