नवी दिल्ली- कोरोना व्हायरसविरोधात लढताना, भारत सरकारने व्हिटॅमिन बी 1 आणि बी 12 यासह 24 फार्मा साहित्य आणि औषधांवरील आंशिक निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, पॅरासिटामॉलवर आणि पॅरासिटामोलपासून बनविलेले फॉर्म्युलेशन निर्यात निर्बंध कायम राहतील, असे सूत्रांनी सांगितले. निर्यातीची शिथिलताबाबत अधिसूचना लवकरच देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा- EXCLUSIVE : निजामुद्दीनमधील संपूर्ण माहिती पोलिसांना होती, मरकझमधील उपस्थितासोबत खास बातचीत
हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे. भारताकडून अपेक्षा ठेवणाऱ्या शेजारील देशांना या औषधी पाठवल्या जाणार आहेत. तरीही देशांतर्गत गरजांना प्रथम प्राधान्य देऊन स्टॉकच्या उपलब्धतेनूसार निर्यात केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 14 वा दिवस आहे.