नवी दिल्ली - महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी आज (गुरुवारी) लोकसभेत केली. याबरोबरच पुण्यातील भिडेवाड येथील पहिल्या महिला शाळेची दुरवस्था झाली असून तिचे नुतनीकरण करण्यात यावे. या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणीही राणा यांनी केली.
हेही वाचा - राजनाथसिंह यांना टॉयलेटपर्यंत सुरक्षा.. तरी तक्रार नाही, अमित शाहांच्या वक्तव्याने लोकसभेत पिकला हशा
१ जानेवरी १८४८ साली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठ येथील भिडे वाड्यात पहिली महिला शाळा सुरू केली. तेथूनच महिलांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. मात्र, या शाळेची आता दुरवस्था झाली आहे. सावित्रीबाई फुले सर्व महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा - भारताची घटना 'सर्वसमावेशक'; त्यामुळेच इतरांपेक्षा वेगळी अन् विशेष..
देशातील सर्व शाळांमधून मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे, अशी मागणी सावित्रीबाई फुले यांनी १९४२ साली पहिल्यांदा केली. तसेच १८७३ मध्ये त्यांनी हुंडा पद्धतीला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना भारतरत्न दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली. याबरोबरच महात्मा फुले यांनाही भारतरत्न दिला जावा, असेही त्या म्हणाल्या.