ETV Bharat / bharat

भारत सरकारने कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सुरू केला 'हा' प्रशिक्षण कोर्स

author img

By

Published : Apr 10, 2020, 2:39 PM IST

भारत सरकारने कोवीड-19च्या व्यवस्थापनासाठी 'इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग' (आयजीओटी) या नावाने एक प्रशिक्षण कोर्स सुरू केला आहे.

Government of India
भारत सरकारने कोरोनाविरोधातील लढ्यासाठी सुरू केला 'हा' प्रशिक्षण कोर्स

भारत सरकारने कोवीड-19च्या व्यवस्थापनासाठी 'इंटिग्रेटेड गव्हर्नमेंट ऑनलाईन ट्रेनिंग' (आयजीओटी) या नावाने एक प्रशिक्षण कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स मानव व संसाधन विकास मंत्रालयाच्या दिक्षा वेबसाईटवर उपलब्ध असेल. कोरोनाचा संसर्ग कार्यक्षमतेने रोखण्यासाठी, हाताळण्यासाठी पहिल्या फळीचे कर्मचारी तयार करणे, हा यामागचा उद्देश आहे. दिक्षा प्लॅटफॉर्म आधीपासूनच 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एक कोटीपेक्षा जास्त शिक्षक आणि विद्यार्थ्याी वापरत आहेत.

भारत कोविड-19 साथीच्या विरूद्ध लढा देत आहे. देशातील कर्मचाऱ्यांची पहिली फळी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कौतुकास्पद काम करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

त्यानुसार, या पहील्या फळीच्या कामगारांचे प्रशिक्षणाची गरज पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने 'Integrated Govt. Online training'(iGOT)नावाने कोरोनाच्या व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण मॉड्यूल सुरू करण्याविषयी ट्विट केले. हा संसर्गजन्य आजार कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या दिक्षा वेबसाईटवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल.

खालील पदांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येईल -

  • वैद्यकीय अधिकारी Doctors
  • परिचारीका Nurses
  • पॅराडेमीक्स Paramedics
  • स्वच्छता कर्मचारी Hygiene Workers
  • तंत्रज्ञ Technicians
  • ऑक्सिलरी नर्सिंग मिडविव्स Auxiliary Nursing Midwives (ANMs)
  • राज्य सरकारी अधिकारी (State Government Officers)
  • Civil Defence Officers
  • Various Police Organisations
  • National Cadet Corps(NCC)
  • Nehru Yuva Kendra Sangathan (NYKS)
  • National Service Scheme
  • Indian Red Cross Society
  • Bharat Scouts and Guides and other volunteers at the stage.

दिक्षा व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून पहिल्या फळीतील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरू केलेल्या या कोर्सचा, प्रशिक्षणाचा, उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

दिक्षा प्लॅटफॉर्म कोणत्याही वेळी, कोठेही शिकण्याच्या अमर्यादित मागण्या पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे. एनसीईआरटी व सीबीएसई व्यतिरिक्त देशातील अनेक राज्ये याचा उपयोग करत आहेत. ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण, क्विझ आयोजित करणे, सर्जनशील व समालोचनात्मक विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरणार आहेत. या पोर्टलच्या वेबसाइटची लिंक - https://igot.gov.in/igot/ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.