नवी दिल्ली - गोल्डन बाबा यावर्षीही गाजियाबाद मधील कावड यात्रेत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. श्री पंचदशानाम जुन्या आखाड्याचे गोल्डन पुरी बाबा उर्फ सुधीर मक्कड अंगावर 16 किलो पेक्षा जास्त सोने घालून यात्रेत सहभागी झाले.
गोल्डन बाबा यांची ही 26 वी महाकावड यात्रा होती. मागील वर्षी गोल्डन बाबा 21 किलो सोने अंगावर घालून सहभागी झाले होते. बाबांच्या ताफ्यात फॉर्च्यूनर पासून टेंम्पोचा समावेश होता. बाबांच्या सुरक्षेसाठी त्यांचे 85 भक्त त्यांच्या सोबत असतात ते त्यांची सेवा करतात. काही दिवसांपासून आजारी असल्याचे गोल्डन बाबांनी सांगितले.
शंकराचे भक्त गोल्डन बाबा
गोल्डन बाबा भगवान शंकराचे भक्त आहेत. दरवर्षी ते भक्तांसह हरिद्वार येथून नवी दिल्ली मधील अशोक गल्ली येथील लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत कावड यात्रा काढतात. येथे ते हरिद्वार येथून आणलेल्या पाण्याचा लक्ष्मी नारायण मंदिरात जलाभिषेक करतात.या यात्रेत त्यांचे पुरुष सेवेकरी गोल्डन बाबांची सेवा करतात.
यावर्षी गोल्डन बाबांची कावड यात्रा 29 जुलै रोजी दिल्ली मध्ये पोहोचणार आहे. 30 जुलै रोजी ते लक्ष्मी नारायण मंदिरात जलाभिषेक करणार आहेत.