तिरुवनंतरपुरम - केरळमधील सोने तस्करी प्रकरणाच्या चौकशीसाठी सीमा शुल्क विभागाला तिरुवनंतपुरम विमातळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची शक्यता कमी आहे. सीमा शुल्क विभागाने विमानतळ परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासासाठी मागितले होते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देण्यात असमर्थता दर्शवली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विमानतळावर 30 किलो सोन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी सीमा शुल्क विभाग तपास करत आहे. आखाती देशांतून तस्करी करुन आणलेले सोने राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानातून आणण्यात येत होते. मात्र, विमानतळावर सोन जप्त करण्यात आले होते.
या तस्करीमागे राजनैतिक अधिकाऱ्यांना असणाऱ्या सवलतींचा गैरवापर करण्यात आल्याचा सीमा शुल्क विभागाला संशय आहे. या प्रकरणात तपास अधिकारी दोन व्यक्तींचा शोध घेत आहेत. हा तस्करीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून(एनआयए) करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. तपासासंबंधी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते.
या प्रकरणाच्या तपासासाठी सीमा शुल्क विभागाला विमानतळ परिसराचे सीसीटीव्ही फुटेज हवे आहे. मात्र, विमानतळाजवळील चक्का बायपास परिसरापर्यंत सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फक्त एका महिन्याचे रेकॉर्डिंग होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.