ETV Bharat / bharat

COVID-19 : गोव्यात होणार रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट; मुख्यमंत्र्यांची माहिती..

दरम्यान, मंगूर हिल भागाला डी-कन्टेन्मेंट झोन करण्याच्या शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्या आहेत. या भागामध्ये कोरोनाचा प्रसार अजूनही होत असल्यामुळे येथील निर्बंध लागूच राहणार आहेत. मंगूर हिल भागातील एकूण आठ हजार भागांपैकी दोन हजार लोकांची कोरोना चाचणी आतापर्यंत पार पडली आहे...

Goa to conduct rapid antigen detection test for COVID-19: CM Pramod Sawant
COVID-19 : गोव्यात होणार रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट; मुख्यमंत्र्यांची माहिती..
author img

By

Published : Jul 6, 2020, 10:04 PM IST

पणजी : कोरोनाच्या चाचण्यांचा वेग वाढावा म्हणून गोव्यामध्ये रॅपिड अँटीजेन डिटेक्शन चाचण्या सुरू करण्यात येणार आहेत. गोव्यात सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या वास्को गावातील मंगूर हिल परिसरापासून या चाचण्यांची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

दरम्यान, मंगूर हिल भागाला डी-कन्टेन्मेंट झोन करण्याच्या शक्यता मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावल्या आहेत. या भागामध्ये कोरोनाचा प्रसार अजूनही होत असल्यामुळे येथील निर्बंध लागूच राहणार आहेत. मंगूर हिल भागातील एकूण आठ हजार भागांपैकी दोन हजार लोकांची कोरोना चाचणी आतापर्यंत पार पडली आहे.

COVID-19 : गोव्यात होणार रॅपिड अँटीजेन डिटेक्शन टेस्ट; मुख्यमंत्र्यांची माहिती..

मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले नाही, की मंगूर हिल भागातील सर्वच लोकांची चाचणी घेण्यात येईल, की केवळ रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या वा लक्षणे दिसणाऱ्या लोकांची चाचणी घेण्यात येणार आहे.

पाच जुलैपर्यंत गोव्यात एकूण १,७६१ रुग्ण आढळले असून, सात लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.