ETV Bharat / bharat

कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; गोव्यातील डॉक्टर 24 तासांच्या संपावर

कोलकाता मधील निवासी डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशच्या डॉक्टरांनी पणजीतील आझाद मैदान ते कांपाल उद्यानदरम्यान रॅली काढली. यामध्ये होमिओपॅथिक, आयुर्वेद, दंत वैद्यकीय, परिचारिका संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब आदीचे पदाधिकारी सहभागी झाले होते

कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; गोव्यातील डॉक्टर 24 तासांच्या संपावर
author img

By

Published : Jun 17, 2019, 6:51 PM IST

पणजी - कोलकाता मधील निवासी डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशच्या डॉक्टरांनी पणजीतील आझाद मैदान ते कांपाल उद्यानदरम्यान रॅली काढली. यामध्ये होमिओपॅथिक, आयुर्वेद, दंत वैद्यकीय, परिचारिका संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब आदीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. रॅलीनंतर डॉक्टरांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सभापती आणि शहर विकासमंत्री यांना दिले. दरम्यान असोसिएशनच्या वतीने मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संप पुकारण्यात आला आहे.

कोलकात्यात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; गोव्यातील डॉक्टर 24 तासांच्या संपावर

आजच्या आंदोलनादरम्यान बोलताना आयएमए गोवाचे अध्यक्ष डॉ. अनिल मेहंदिता म्हणाले की, डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन छेडण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 2013 मध्ये कायदा तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, डॉक्टरची चौकशी केल्याशिवाय अटक करण्यात येऊ नये, अशी तरतूद आहे. या कायद्याची देशभरात अंमलबजावणी करण्यात यावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

आंदोलनाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांची दांडी -
आजच्या संपात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर का सहभागी झाले नाहीत, असे विचारले असता, डॉ. मेहंदिता म्हणाले की, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाती निवासी डॉक्टर हे एम्सच्या निर्देशाप्रमाणे चालत असतात. त्यामुळे ते वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, त्यांचा या संपाला पाठिंबा आहे. आजच्या संपात वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संघटना सहभागी झाल्या असल्या तरीही आपत्कालीन सेवा सुरू आहेत. रुग्णांची कुठेही हेळसांड होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

संपाविषयी बोलताना आयएमए गोवाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर म्हणाले की, डॉक्टर विरोधात दाद मागण्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी हिंसेचा मार्ग अवलंबण्याऐवजी योग्य मार्गाचा अवलंब करावा. तसेच या घटनेची दखल राज्यकर्त्यांनी घ्यावी. त्यानुसार गोव्यातील कनिष्ठ आणि ज्येष्ठ डॉक्टरना संरक्षण द्यावं. असं त्यांनी सांगितलं. आज पुकारण्यात आलेल्या संपात संपूर्ण गोव्यातील सुमारे दोनशे डॉक्टर सहभागी झाले होते.

Intro:पणजी : कोलकातामधील निवासी डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करून त्याला पाठिंबा देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आज पणजीत निदर्शने करण्यात आली. तसेच मंगळवारी सकाळी सहावाजेपर्यंत संप पुकारला आहे.

Body:इंडियन मेडीकल असोसिएशच्यख डॉक्टरनी पणजीतील आझाद मैदान ते कांपाल उद्यान दरम्यान फेरी काढून डॉक्टरांवरील हल्ल्याचा घटनेचा निषेध केला. यामध्ये होमिओपॅथिक, आयुर्वेद, दंतवैद्यकीय, परिचारिका आदींच्या संघटना, लायन्स क्लब, रोटरी क्लब आदीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सभापती आणि शहर विकास मंत्री यांना देण्यात आली.
आजच्या आंदोलनाविषयी बोलताना आयएमए गोवाचे अध्यक्ष डॉ. अनिल मेहंदिता म्हणाले, डॉक्टरांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन छेडण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार 2013 मध्ये कायदा तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की, डॉक्टरची चौकशी केल्याशिवाय अटक केली जाऊ येऊ असेल म्हटले आहे. या कायद्याची देशभरात अंमलबजावणी करण्यात यावी.
आजच्या संपात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर का सहभागी झाले नाहीत, असे विचारले असता, डॉ. मेहंदिता म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविलाययातील निवासी डॉक्टर हे एम्सच्या निर्देशाप्रमाणे चालत असतात. त्यामुळे ते वरिष्ठांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, त्यांचा संपाला पाठिंबा आहे. आजच्या संपात वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संघटना सहभागी झाल्या असल्या तरीही आपत्कालीन सेवा सुरू आहेत. रुगणांची कुठेही हेळसांड होणार नाही.
संपाविषयी बोलताना आयएमए गोवाचे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर म्हणाले, डॉक्टर विरोधात दाद मागण्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी हिंसेचा मार्ग अवलंबण्याऐवजी त्याचा वापर करावा. तसेच या घटनेची दखल राज्यकर्त्यांनी घ्यावी. त्यानुसार गोव्यातील कनिष्ठ आणि ज्येष्ठ डॉक्टरना संरक्ष द्यावे.
आजच्या संपात संपूर्ण गोव्यातील सुमारे दोनशे डॉक्टर सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.