फरिदाबाद - परीक्षा देऊन घरी जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गोळी मारून हत्या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, की मुख्य आरोपी तौसीफ मागील अनेक वर्षापासून तरुणीला आपल्याशी मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करत होता.
गोळी मारून केली होती हत्या -
काल (सोमवार) आरोपींनी आधी तरुणीला कारमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला व त्यात अयशस्वी ठरल्यानंतर तिच्यावर गोळी झाडली त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्या फरीदाबादमधील सेक्टर-23 मध्ये प्रदर्शन केले.
पोलिसांवर आरोप -
मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले, की यापूर्वीही आरोपींनी तरुणीला त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. याची तक्रारही त्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच तरुणाचा जीव गेला. तरुणी बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होती.
2018 पासून देत होता त्रास -
मृत तरुणीचे वडील मूळचे यूपीमधील हापुड़ येथील रहिवासी आहेत. परंतु अनेक वर्षापासून सेक्टर-23 मध्ये रहात होते. आरोपी बारावीपर्यंत तरुणीसोबतच शिकायला होता. तो तिच्यावर दोस्ती करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र मुलीने त्याला स्पष्ट नकार दिला होता.
२०१८ मध्येही आरोपीने तरुणीचे अपहरण केले होते. मात्र त्यावेळी कुटुंबाने लोकलाजेखातर प्रकरण दाबले होते. पोलिसांनी तरुणीच्या भावाच्या तक्रारीनुसार आरोपी तौसीफविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला व त्याचा साथीदार रेहानला अटक केली आहे.