नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यातील सबलगड पोलीस स्टेशन भागात 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडली. मुलीचा मृतदेह मोहरीच्या शेतात आढळला. मृतदेहाची अवस्था पाहून मुलीवर बलात्कार झाल्याचे दिसून आले. कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी परिसरातील बंटी नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
बलात्कारानंतर खून -
सबलगड ठाणे परिसरातील खिरकई गावात 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. आरोपी बंटी पीडित मुलीच्या काकूचा विनयभंग केल्याप्रकरणी तुरूंगात गेला होता. 10 दिवसांपूर्वी तो तुरूंगातून बाहेर आला होता. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला अटक करण्यात आली.
आरोपी बंटी रजकने यापूर्वी पीडित मुलीच्या काकूचा घरात घुसून विनयभंग केला होता. याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. सहा महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगून तो दहा दिवसांपूर्वी गावी परतला होता.