नवी दिल्ली - केंद्रीय मुख्यमंत्री गिरीराज सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मेहबुबा ह्या राजकीय फायद्यासाठी '35-ए' कलमाच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी टीका सिंह यांनी केली आहे.
'जम्मु काश्मीरमध्ये काँग्रेस, मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुला राजकीय फायद्यासाठी काश्मीरी लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. काश्मीरला नैसर्गिक सौंदर्य लाभले असून स्विर्झलँड बनण्याची क्षमता काश्मीरमध्ये आहे. मात्र सत्ता असताना त्यांनी तिथला विकास केला नाही. आपल्या फायद्यासाठी ते लोकांना '35-ए' कलमाच्या नावाखाली भडकावण्याचे काम करत आहेत', अशी टीका सिंह यांनी केली आहे.
पीपल्स डेमॉक्रॉटिक पक्षाच्या अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका केली होती. '35-ए' कलमासोबत छेडछाड केल्यास ते जळून खाक होतील अशी धमकी मेहबुबा यांनी सरकारला दिली होती.