गाजीपूर (उत्तर प्रदेश) - जिल्ह्यातील बसपच्या कार्याकर्त्याने पक्षाने तिकिटाच्या बदल्यात दोन कोटीची मागणी केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, 62 वर्षीय बसपा कार्यकर्ता मुन्नू प्रसाद यांनी मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) रात्री विषप्राशन करत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी मुन्नू प्रसाद यांनी चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी निवडणुकीच्या तिकिटासाठी पक्षाने दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. मुन्नू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी आमच्या जीवाला धोका असून आम्हाला सुरक्षा पुरवा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
हेही वाचा - उपमुख्यमंत्री नितीन पटेलांवर चप्पल फेकणारा गुजरात पोलिसांच्या अटकेत