लखनऊ - संचारबंदी सुरू असताना अनेक पोलीस अडचणीत अडकलेल्या सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. गाझियाबाद येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात केवळ त्यांची मुलगी व मुलीचा मुलगा, असे दोघेच आहेत. पण, संचारबंदीमुळे त्याच्या अंत्य विधीवेळी तिरडीला खांदा देण्यासाठी चारजणही नव्हते. अखेर त्या महिलेने पोलिसांना भेटून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी अंत्यविधीची व्यवस्था करून त्या महिलेला काही आर्थिक मदतही केली.
महिलेने मानले आभार
पोलिसांनी सर्व माहिती घेतल्यानंतर शव वाहिकेची व्यवस्था करून दिली. त्याचबरोबर त्यांना आर्थिक मदत करत महिलेसाठी व तिच्या मुलासाठी जेवणाची व्यवस्था पोलीस चौकीतच करून दिली. यामुळे महिलेने त्यांचे आभार मानले.
हेही वाचा - तेलंगणामध्ये कोरोनामुळे आणखी 3 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा ९ वर