हैदराबाद : हुरियत कॉन्फरन्सचे नव्वद वर्षांचे आजीवन अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी यांनी व्यासपीठाचा राजीनामा दिला. याचा महत्त्वाचा परिणाम जम्मू आणि काश्मीरच्या फुटीरवादी कारवायांवर होणार आहे. त्यांनी हुरियत सोडण्यामागचे कारण म्हणजे राजकीय संन्यास सांगितले आहे. त्यांचे वाढलेले वय पाहता राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे. पण यामुळे काश्मीरमधल्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला असणार. समजा त्यांचा हुरियतचे प्रमुख म्हणून मृत्यू झाला असता तर काश्मीरमध्ये अशांतता निर्माण व्हायला ते एक मोठे कारण झाले असते.
काश्मीरशी संबंधित असलेले सरकार आणि लोकांनाही आता बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश करण्यामागे ज्यांचे मोठे योगदान होते, ते भाजप नेते राम माधव यांनी गिलानी यांच्या राजीनाम्यानंतर एक मिनिटाआधी एकदा नव्हे तीनदा ट्विट करून ‘गिलानी यांनी हुरियतचा राजीनामा दिला’ हे सांगितले. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी गिलानी यांचे पत्र जोडले होते. माधव यांनी आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘काश्मीरचा तरुण, अनेक कुटुंबे यांचे आयुष्य बिघडून टाकायला आणि खोऱ्यात हिंसा आणि दहशत निर्माण करायला जबाबदार व्यक्तीने कारण न सांगता हुरियतचा राजीनामा दिला. यामुळे त्यांच्या मागील पापांमधून त्यांना मुक्ती मिळते का?’ याचा अर्थ वर्षभर गिलानी शांत असूनही त्यांचे राजकीय महत्त्व हे होतेच.
कलम ३७० रद्द केले तेव्हा छोटे संदेश सोडले तर हुरियत किंवा गिलानी यांनी काही वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही. किंवा त्यांनी कुठला निषेध नोंदवला नाही. गिलानी यांचे राजीनामा पत्र ऑडिओ संदेशाबरोबर लोकांपर्यंत पोचले. त्यात त्यांनी हुरियत काॅन्फरन्समध्ये पैसा आणि सत्ता यासाठी होणारी भांडणे, तंटे, कुरघोड्या यांचा उल्लेख केला होता आणि एका मिनिटात भारताच्या सीमेबाहेर प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातम्यांमध्ये ही हेडलाईन झाली.या पत्रात हे स्पष्ट दिसतेय की, हुरियतने फुटीरतावाद सोडला आहे आणि ते आता तसे राहिले नाहीत. हेच ते नेते ज्यांनी २००८मध्ये अमरनाथ जमीन विवादाच्या वेळी स्वत:कडे सत्ता ठेवून लोकप्रियता मिळवली होती. त्यावेळी त्यांच्या समांतर कोणालाही स्वीकारायला ते तयार नव्हते. त्याच वेळी हुरियतचा कायदेशीर उत्तराधिकारी म्हणून त्यांचा मुलगा डॉ. नईमला नियुक्त केल्याचा आरोप होता.यामुळे संपूर्ण फुटीरतावादी कँपमध्ये हिंसाचार सुरू झाला होता आणि शेवटी त्यांना हे उत्तराधिकार मागे घ्यावे लागले होते.
तेव्हा त्यांनी अनुभवलेल्या लोकप्रियतेला तसे काटे फारसे नव्हते आणि धोकाही कमी होता. पण आता ५ ऑगस्ट २०१९ नंतर जो निर्णय झाला त्यानंतर सरकारने फुटीरतावादावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांचा धोका वाढला होता.
गिलानी यांनी नेहमीच सरकारवर टीका केली आणि त्यांच्या असामंजस्याच्या भूमिकेमुळे इतर फुटीरतावाद्यांच्या विचारांवरही ते टीकाच करायचे. अल्ताफ अहमद उर्फ अझम इन्किलाबीने ९०च्या सुरुवातीलाच शस्त्रे खाली ठेवली, तेव्हा याला आत्मसमर्पण म्हणणारे हेच गिलानी होते. पाकिस्तानात बसलेल्या लोकांबरोबरही इन्किलाबींचे पटत नव्हते. पण त्याच्यावर घोटाळा केल्याचा आरोप नव्हता. २००३मध्ये जेव्हा गिलानी यांनी मूळ हुरियत सोडली, तेव्हा त्यांच्यावर भारत आणि पाकिस्तान चर्चेत भाग घेण्यासाठी त्यांनी आपले नेतृत्व विकले असा आरोप केला गेला. त्यांनी दुसरी हुरियत स्थापन केली आणि त्याला त्यांनी शुद्धीकरण प्रक्रिया असे नाव दिले. हे पत्र सार्वजनिक केले त्यात गिलानी यांनी घोटाळ्याची कबुली दिली. नेमके याच वेळी ज्यावेळी भारताची मुख्य तपास यंत्रणा एनआयए मनी लाँडरिंग प्रकरणांची चौकशी करत आहे. यात त्यांच्या जावयासह अनेक फुटीरतावाद्यांचा समावेश आहे.
गिलानी यांच्या राजीनाम्या पत्राने अनेक किडे वळवळायला लागले आहेत. श्रीनगर ते मुझफ्फरनगरपर्यंत त्यांच्या राजीनामा पत्रावर बरेच अनुमान लावले जाते आहे. गिलानी यांच्या नातीने ट्विट करून सांगितले आहे, ‘ कोणी आपली विचारधारा, राजकीय भूमिका, श्रद्धा आणि विश्वास यांचा राजीनामा देऊ शकत नाही.’ हा संदेश गिलानी यांना हुरियतच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी आहे. तसे करण्यात ते जवळपास यशस्वी झाले होते. पण त्यांनी तसे करण्याआधीच गिलानी सन्मानाने मंचाच्या बाहेर पडले.
- बिलाल भट.