ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यात वायूगळतीमुळे एकाचा मृत्यू, अन्य तिघे जखमी

author img

By

Published : Jun 27, 2020, 12:41 PM IST

Updated : Jun 27, 2020, 2:16 PM IST

आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातील एका कंपनीत वायू गळती झाली आहे. दुरुस्ती केलेला पाइपच फुटल्याने ही घटना घडली. या घटनेत कंपनीच्या महाव्यवस्थापकाचा मृत्यू झाला आहे.

Gas leakage in Nandyala of Kurnool district andhra pradesh
आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यात वायूगळतीमुळे एकाचा मृत्यू

कर्नूल (आंध्र प्रदेश) - जिल्ह्यातील एसपीवाय कंपनीत वायू गळती झाली आहे. या घटनेत कंपनीच्या महाव्यवस्थापकाचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जण जखमी आहेत. नांदल्या भागात ही घटना घडली. कंपनीतून वायू गळती होत असल्याचे लक्षात येताच कंपनीतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. श्रीनिवासराव असे मृत महाव्यवस्थापकाचे नाव आहे.

कंपनीतील एका पाइपमधून अमोनिया वायूची गळती झाली. विशेष म्हणजे, हा पाइप कालच दुरुस्त करण्यात आला होता. तोच फुटल्याने ही वायूगळती झाली, असे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. एसपीवाय ही कंपनी नंदी ग्रुपच्या मालकीची आहे.

Last Updated : Jun 27, 2020, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.