भिमावरम - गणेश उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश मंडळे विविध देखावे साजरे करतात. आंध्र प्रदेशमधली भिमावरम येथे एका गणेश मंडळाने एकूण ३३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचा नोटांचा देखावा केला आहे.
गणपतीच्या स्थापनेपासून १० दिवसांतील प्रत्येक दिवशी मंडळ वेगवेगळे देखावे करते. लक्ष्मी गणपती अवतारच्या दिवशी मंडळाने ५०,१००,२००,५००,१००० आणि २००० च्या नोटा ओऊन त्यांचा देखावा केला आहे. यामध्ये एकूण ३३ लाख ३३ हजार ३३३ रुपयांच्या नोटांचा वापर केला आहे. हा ११ वा वर्धापन दिवस असून पहिल्यांदा या देखाव्याची सुरवात १ लाखांपासून करण्यात आली होती.
भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता या उत्सवाची सुरूवात केली होती. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. अवघ्या भारतभर गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे.