अमरावती - भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे जनक असलेले महात्मा गांधी, हे एक उत्कृष्ट आहारतज्ज्ञ म्हणूनदेखील ओळखले जात. त्यांनी केलेले सत्याग्रह, उपोषण यांमध्ये लोकांसह त्यांना साथ दिली ती त्यांच्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्याने. गांधीजींनी अनेक यात्रा कितीतरी किलोमीटर चालत केल्या. जे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शारिरिक आणि मानसिक ताकदीची आणि सहनशक्तीची गरज होती. जी त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमधून पूर्ण होत. १९४२ ते १९४४ च्या दरम्यान, पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये कैदेत असताना, बापूंनी आपल्या आरोग्यविषयक टीपा लिहून ठेवल्या होत्या. या टीपा, नंतर सुशिला नायर यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्या. मानवांना निरोगी आयुष्य जगण्यासाठीची माहिती भरपूर प्रमाणात असल्यामुळे, गांधीजींनी आपल्या प्राचीन शास्त्रांची नेहमीच प्रशंसा केली.
गांधीजींनी एखाद्या योगीप्रमाणे आयुष्य जगण्यावर भर दिला. तसेच त्यांनी आहार-नियंत्रणाद्वारे आपल्या ज्ञानेंद्रियांवर ताबा ठेवणारे शास्त्र, म्हणजेच ब्रह्मचार्य पाळले. उपवास म्हणजे अन्नत्याग नव्हे, तर अपायकारक अन्नाचा त्याग होय. पृथ्वी, पाणी, निर्वात, प्रकाश आणि हवा यांचे मिश्रण म्हणजे मानवी शरीर असे ते म्हणत. ज्यामध्ये कृती करणाऱ्या पाच भावना - हात, पाय, तोंड, गुदद्वार आणि जननेंद्रिये; आणि आकलन करणाऱ्या पाच भावना - त्वचेमार्फत स्पर्शाची भावना, नाकाद्वारे वास, जिभेद्वारे चव, डोळ्यांद्वारे पाहणे आणि कानांद्वारे ऐकणे यांचा समावेश आहे. त्यांनी अपचन हे सर्व प्रमुख आजारांचे एकमेव कारण असल्याचे सांगितले, जे या घटकांमधील विकृतीचे लक्षण आहे. आणि यावर अनेक पारंपारिक उपाय देखील सुचविले.
हेही वाचा : महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा...
गांधीजींनी कडक शाकाहारी आहार पाळला ज्यामध्ये धान्य, कडधान्य, खाद्यतेल मुळे, कंद, हिरवी पाने, ताजे व कोरडे फळे, दूध व दुधाचे पदार्थ यांचा समावेश होता. त्यांनी नेहमीच औषध घेण्यास नकार दिला आणि आपल्या आहारात बदल करून आजार बरा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या एका वाक्यामधून त्यांच्या आहारविषयक सवयी स्पष्ट होतात - अन्न हे एक कर्तव्य म्हणून घेतले पाहिजे, किंबहुना औषध म्हणूनदेखील घ्यावे, मात्र केवळ जिभेच्या चोचल्यासाठी कधीही घेऊ नये. त्यांनी नेहमीच हर्बल चहासारख्या उबदार पेय पदार्थांचे सेवन करण्याचे समर्थन दिले. तसेच काही प्रमाणात कॉफीचेही समर्थन केले. ते पूर्णपणे दारू, तंबाखू आणि ड्रग्जच्या विरोधात होते. कारण त्यांचा असा विश्वास होता, की ते पदार्थ युक्तिवादाच्या क्षमतेवर परिणाम करतात आणि आपल्या शरीरातील नियमित चयापचय क्रियांमध्ये असंतुलन ठेवतात.
निरोगी मन निरोगी शरीराकडे नेते यावर गांधीजींचा विश्वास होता. ते म्हणत, की मनाला कधीही रिकामे ठेऊ नये. काहीच विचार करायचा नसल्यास देवाचे नामस्मरण करावे असे ते म्हणत. त्यांनी नेहमी सत्य आणि अहिंसेच्या अनुयायांनी कामुक साहित्य आणि अशोभनीय बोलण्यापासून दूर रहावे असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे, त्यांनी असे मत व्यक्त केले की शरीर हे योग आणि इतर व्यायामासारख्या गोष्टींमध्ये व्यस्त असणे आवश्यक आहे. कारण, सुस्तपणामुळे आजारपण येते. त्यांचा असा विश्वास होता की आरोग्य ही संपत्ती आहे. ते म्हणत, "सोने आणि चांदीचे तुकडे नव्हे, तर हे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे."
हेही वाचा : आधुनिक प्रबोधनाचे नवे मार्ग शोधताना : गांधी आणि टागोर