ETV Bharat / bharat

गांधीजींची स्वातंत्र्याची संकल्पना... - गांधी

यावर्षी, आपण १५०वी गांधी जयंती साजरी करतो आहे. मात्र खेदाची बाब अशी, की दरवर्षी आपण केवळ एक नित्यक्रम म्हणून ही जयंती साजरी करतो. गांधीजींच्या विचारांकडे मात्र आपण गेल्या ७२ वर्षांपासून दुर्लक्ष करत आलो आहोत. जागतिकीकरणाच्या या युगात, गांधीजींच्या विचारांचे दाखले देणाऱ्या लोकांचे उच्च राहणीमान हे याचेच उदाहरण आहे.

गांधीजी
author img

By

Published : Aug 29, 2019, 12:43 AM IST

नवी दिल्ली - दरवर्षी आपण २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी करतो. यावर्षी, आपण १५०वी गांधी जयंती साजरी करतो आहे. मात्र खेदाची बाब अशी, की दरवर्षी आपण केवळ एक नित्यक्रम म्हणून ही जयंती साजरी करतो. गांधीजींच्या विचारांकडे मात्र आपण गेल्या ७२ वर्षांपासून दुर्लक्ष करत आलो आहोत. जागतिकीकरणाच्या या युगात, गांधीजींच्या विचारांचे दाखले देणाऱ्या लोकांचे उच्च राहणीमान हे याचेच उदाहरण आहे.

मात्र, भारताच्या लोकसंख्येच्या ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही तरुण आहे. ज्यांच्या हातात भारताचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे. आणि, २१व्या शतकातील या पिढीला गांधीजींच्या विचारांचा वारसा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

आजची तरुण पिढी ही खूपच चंचल आहे. त्यांचे आयुष्य वेगवान आहे. शिवाय त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची देखील घाई आहे. मात्र, यासोबतच त्यांची मने संवेदनशील आहेत. त्यांना आपल्या संस्कृतीची मुळे, आपल्या व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक यांबद्दल जाणून घेण्यास, आणि आवश्यक त्या गोष्टींमध्ये आवश्यक तो बदल घडवून आणण्यात रस आहे. आजच्या पिढीला हे जाणून अभिमान वाटेल, की मागील शतकातील थोर पुरुष, जसेकी आईनस्टाईन, रसेल, बर्नार्ड शॉ आणि कितीतरी नोबेल विजेते हे गांधीजींना मानत. मानवतेला दिशा देणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणून ते गांधीजींकडे पाहत.

बुद्ध आणि जीजस ख्रिस्ताप्रमाणेच गांधीजींनीही गरीबांसाठी आणि मानवतेसाठीच आपले जीवन समर्पित केले. राजमोहन गांधी यांच्या 'मोहनदास' मध्ये मिखाईल नोएमा या अरबी कवीने रचलेल्या या ओळी आहेत : “The spindle in Gandhi’s hand became sharper than the sword; the simple white sheet wrapping Gandhi’s body was an armour plate which guns from the fleet of the Master of the Seas could not pierce and the goat of Gandhi became stronger than the British Lion.”

भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशके झाल्यानंतर, आजचा तरुण विचारतो, की गांधीजी आणि इतर स्वातंत्र्य सेनानींनी ज्या स्वातंत्र्याची अपेक्षा केली होती, जे स्वप्न पाहिले होते, जे आपण सर्व दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला साजरे करतो, ते हेच स्वातंत्र्य आहे का? आपले नेते २ ऑक्टोबर आणि ३० जानेवारीला दिल्लीच्या राजघाटवर आणि देशभरातील गांधीजींच्या पुतळ्यांसमोर बसून का प्रार्थना करतात? गांधीजींच्या मते स्वातंत्र्य किंवा स्वराज काय होते? आणि गांधीजी जर आत्ता आपल्यात असते, तर त्यांनी भारताने केलेली प्रगती पाहून आनंद व्यक्त केला असता काय? या प्रश्नांची उत्तरे देताना, त्यांना हे सांगणे आवश्यक आहे, की गांधीजींच्या मते स्वराज म्हणजे समाजातील दुर्बलांचे सबलीकरण करणे होते. मात्र, कटू सत्य हेच आहे, की आज स्वतंत्र्य भारतातील ३३ कोटी लोक आज दारिद्र्य रेषेखाली आहेत. गांधीजींच्या मते, स्वातंत्र्य म्हणजे स्व-प्रभूत्व आणि स्वयंशिस्त.

१८९३ मधील, दक्षिण आफ्रिकेच्या पिटरमॅरिट्जबर्ग गावातील त्या रात्री, जेव्हा गांधीजींना रेल्वेच्या डब्यातून बाहेर काढले गेले होते, तेव्हापासून ते ३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या विश्वासघातकी हत्येपर्यंत, गांधीजींनी आयुष्यभर हिंसा, हाव, अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढा दिला होता. आपल्या आयुष्यात गांधीजींनी जेवढे सोसले आणि जेवढा त्याग केला, ते मानवी इतिहासात कदाचित कोणीच केले नसेल. त्यामुळेच, आईनस्टाईन देखील गांधीजींबद्दल बोलताना म्हणतात, की गांधीबद्दल पुढील पिढ्यांना सांगितल्यास त्यांना यावर विश्वास बसणार नाही. आणि आपल्या संपत चाललेल्या पिढीचे हे कर्तव्य आहे की, पुढच्या पिढीला आपण गांधीजींचे महत्व सांगितले पाहिजे.

Intro:Body:

gandhi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.