बेळगाव - कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातून सामुहिक आत्महत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी रेल्वेखाली आत्महत्या केली. काल (बुधवार) रात्री निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेखाली आत्महत्या करत चौघांनी आपले जीवन संपविले. जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात ही घटना घडली.
रायबाग तालुक्यात घडली घटना -
दाम्पत्य आणि त्यांच्या दोन मुलांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या सामुहिक आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रायबाग तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात चारही मृतदेह छिनविच्छिन्न अवस्थेत शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. बेळगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच या प्रकरणी तपास सुरू केला आहे.