राजसमंद - राजस्थानमध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 वरील दिवेर घटा सेक्शन येथे रविवारी सकाळी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये 4 जण ठार, तर 10 हून अधिक जण जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना देवगड येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींची स्थिती गंभीर आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. क्रेनच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त वाहन रस्त्यावरून हटवण्यात आले.